डेब्युमध्येच हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या सरफराजला BCCI कडून मिळालं मोठं गिफ्ट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sarfaraz khan | संधीचं सोनं करणारे खूप कमी लोक असतात. भारताच्या एका खेळाडूने ही संधी साधत कमालीची कामगिरी करुन दाखवली आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये राजकोट येथे तिसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना क्रिकेटपटू सरफराज खान (Sarfaraz khan) आणि त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत स्पेशल ठरला.

मुंबईकर सरफराज खानला टीम इंडियाची कॅप मिळताच त्याच्या कुटुंबाला आनंद गगनात मावेना झाला. सरफराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांनी भारताकडून या कसोटीत पदार्पण केले आहे. दोघांचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण आहे. सरफराज हा 311 वा तर ध्रुव हा कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा 312 वा खेळाडू ठरला.

सरफराजला बीसीसीआयचं मोठं गिफ्ट

सरफराज खानने (Sarfaraz khan) डेब्युमध्येच सर्वांचं मन जिंकलं. त्याने 48 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. पहिल्याच कसोटीत सरफराज इंग्लंडच्या स्पिनर्स विरुद्ध जबरदस्त खेळला. त्याच्या खेळाने सर्वांचीच मने जिंकली. या कामगिरीबद्दल बीसीसीआयनेही त्याला मोठं सरप्राइज दिलं. आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये 66 धावा फटकावणाऱ्या सरफराजला बीसीसीआयने मोठं गिफ्ट दिलं.

सरफराज खानचा लहान भाऊ मुशीर खानसोबत बोलताना त्याला हे सरप्राइज मिळालं. बीसीसीआयने एका स्पेशल व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून दोन्ही भावांचं बोलण घडवून आणलं. हा सरफराजसाठी एक सुखद धक्का होता. सरफराजने आपल्या बॅटिंगबद्दल मुशीरला प्रश्न केला. त्यावर सरफराजने पहिल्या डावात कमाल केल्याचं त्याने सांगितलं. याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

सरफराजचं कुटुंब भावूक

या व्हिडीओवर चाहत्यांच्याही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. सरफराजच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोहित शर्मादेखील त्याच्या खेळीवर खुश झाला. सरफराजच्या पहिल्या मॅचसाठी त्याचे कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित होतं. त्याच्या वडिलांना तर मुलाला बघून अश्रु अनावर झाले.

सरफराजचा (Sarfaraz khan) भाऊ मुशीर खान हा देखील क्रिकेटपटू आहे. नुकतीच अंडर-19 टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. मुशीर त्या टीमचा भाग होता. काल झालेल्या सामन्यात दोघा भावांचे बोलणे करुन बीसीसीआयने सरफराजला आनंदाचा धक्का दिला.

News Title :  Sarfaraz khan gets big gift from BCCI

महत्त्वाच्या बातम्या –

जया अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!

चांगल्या बायकोत असतात ‘या’ 3 गोष्टी, नवरा कायम राहतो खूश!

मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

डायबेटिस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांचा ऐतिहासिक निर्णय, शरद पवारांना धक्का