गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate | फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून सोने-चांदीचे भाव कमी जास्त होत आहेत. आज मात्र, सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आजचा दिवस (Gold-Silver Rate) तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.

सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे आज सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. या तीन दिवसांत सोने 900 रुपयांनी उतरले आहे तर, चांदीने मात्र दरवाढीसाठी जोर लावला. आजचे सोने-चांदीचे दर खाली दिले आहेत.

सोन्याच्या भावात काल मोठी घसरण झाली. सोने तब्बल 800 रुपयांनी आपटले आहे. म्हणजे या तीन दिवसातच सोने 900 रुपयांनी उतरले आहे. मात्र, चांदीच्या किमती जैसे थे आहेत. 13 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी उतरला. 14 फेब्रुवारी रोजी 680 रुपयांची घसरण झाली. तर, काल म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा सोने 100 रुपयांनी उतरले. असे जवळपास या आठवड्यात सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले.

आजचे सोने-चांदीचे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Rate) सोने-चांदीच्या कॅरेटनुसार किमती ठरल्या आहेत. त्यानुसार आता 22 कॅरेट सोने 57,040 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे चांदीचा भाव काही कमी झाला नाही.

या महिन्यात चांदी 1700 रुपयांनी महागली. त्यात 2 हजार कमी झाले होते. त्यात भाव कमी-जास्त होत राहिले. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली होती. 14 तारखेला त्याची किमत 1500 रुपयांनी घसरली. मात्र, काल फेब्रुवारी रोजी किंमती 500 रुपयांनी वाढल्या. त्यामुळे सध्या एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये झाला आहे.

कॅरेटचा भाव ‘असा’ असेल

22 कॅरेट सोने 57,040 रुपये (Gold-Silver Rate) प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 14 कॅरेट सोने 35,982 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत होत असते.

News Title :  Gold-Silver Rate today 16 feb  

महत्त्वाच्या बातम्या –

जया अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!

चांगल्या बायकोत असतात ‘या’ 3 गोष्टी, नवरा कायम राहतो खूश!

मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

डायबेटिस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांचा ऐतिहासिक निर्णय, शरद पवारांना धक्का