Rashmika Mandanna | ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. ‘अॅनिमल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्येही आपली जादू दाखवली. आपली गोड स्माइल आणि क्यूट अदामुळे ती (Rashmika Mandanna ) नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. अभिनेता रणबीर कपूर सोबतचा तिचा अॅनिमल चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्यांची जोडीही प्रेक्षकांना चांगली भावली.
रश्मिकाने 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याआधी तिने तेलगू, तमिळ चित्रपटसृष्टीमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली होती. दक्षिणेतील लेडी सुपरस्टार म्हणून रश्मिकाला ओळखलं जातं. आता नुकतीच रश्मिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे.
रश्मिका मंदानाने पोस्ट करत दिली माहिती
‘फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30’ ही यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 30 व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांचं वय 30 वर्षांखालील आहे त्यांच्या कामगिरीचा गौरव याद्वारे केला जातो. यामध्ये आता फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांचाही समावेश झाला आहे.
View this post on Instagram
यावर्षी ‘अॅनिमल’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna )यामध्ये स्थान पटकावले आहे. तिच्यासोबत अजून दोन अभिनेत्रींचा यात समावेश झाला आहे. 28 वर्षीय अभिनेत्री राधिका मदान आणि 25 वर्षीय अदिती सेहगल या दोघींना देखील यात स्थान मिळालं आहे. रश्मिकाने या संदर्भात सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. रश्मिकाने वयाच्या 27 व्या वर्षी ही मोठी कामगिरी केली आहे. याबद्दल तिला सोशल मिडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिचे चाहते या बातमीमुळे खुश झाले आहेत.
‘या’ चित्रपटात दिसणार रश्मिका
गेल्यावर्षी रश्मिकाचे (Rashmika Mandanna) तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. तिचा पहिला चित्रपट ‘वारीसू’ हा अॅक्शनपट होता. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली होती. तसेच ती सिद्धार्थ मल्होत्रासह ‘मिशन मजनू’मध्येही झळकली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.
यानंतर संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात रश्मिका झळकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 900 कोटींचा गल्ला कामावला. आता ती ‘पुष्पा 2: द रुल’, ‘रेनबो’, ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘छावा’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
News Title : Rashmika Mandanna in Forbes India 30 Under 30
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी पदार्पणात लेकाची अर्धशतकी खेळी अन् बापाच्या डोळ्यात पाणी!
जया अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!
चांगल्या बायकोत असतात ‘या’ 3 गोष्टी, नवरा कायम राहतो खूश!
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
डायबेटिस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!