टायगर ईज बॅक, महेश गायकवाड यांना डिस्चार्ज, ठाण्यात झळकले बॅनर्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahesh Gaikwad | महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गेल्या काही दिवसांआधी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर महेश गायकवाड यांना ठाण्याच्या ज्युपीटर रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान कालच गणपत गायकवाड यांना तळोजा कारागृहामध्ये जेरबंद करण्यात आलं असून आता महेश गायकवाड यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

ठाण्यात झळकले बॅनर्स

महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर 14 दिवस उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. यामुळे कल्याण शहरामध्ये त्यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘गोर गरिबांचा कैवारी…’, ‘टायगर इज बॅक’, हेच प्रेम हेच आशीर्वाद, जनतेचा रथ पुन्हा लवकरच मैदानात येणार, महेश गायकवाड कल्याणकर तुमचे स्वागत करत आहेत.

Tiger is back… Soon in the field, Mahesh Gaikwad’s banners discussed in Kalyan-Dombivli – Marathi News | Ganpat gaikwad firing, Mahesh gaikwad to get discharge today many banners in kalyan for welcome

बॅनरबाजीमुळे राजकीय चर्चांना उधाण येऊ लागलं आहे. महेश गायकवाड यांचे बॅनर सर्वत्र झळकत आहेत. दुसरीकडे महेश गायकवाड शहरप्रमुख, माजी नगरसेवक, भावी आमदार अशा आशयाचे बॅनर्स कल्याण शहरामध्ये लावण्यात आले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

14 दिवस उपचार

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या कार्यालयामध्ये गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी 2 फेब्रुवारी महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादावरून गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील गंभीर जखमी झाले. त्यामुळे दोघांनाही तातडीने ज्युपीटर रूग्णालायत दाखल करण्यात आलं. गेली 14 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

शस्त्रक्रिया यशस्वी

महेश जाधव यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू केले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही गोळ्या काढण्यात आल्या. त्यानंतर 14 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आणि आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

कल्याणमध्ये आज महेश गायकवाड यांचं बॅनरबाजी करत जंगी स्वागत केलं जाणार आहे. कार्यकर्त्यांचा आनंद गगणामध्ये मावेनासा झाला आहे. यामुळे आता शिंदे गटातून महेश गायकवाड आगामी निवडणूक लढवणार असल्याची चिन्हे आहेत.

News Title – Mahesh Gaikwad Discharge And Bannerbaaji in kalyan

महत्त्वाच्या बातम्या

कसोटी पदार्पणात लेकाची अर्धशतकी खेळी अन् बापाच्या डोळ्यात पाणी!

जया अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!

चांगल्या बायकोत असतात ‘या’ 3 गोष्टी, नवरा कायम राहतो खूश!

मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

डायबेटिस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!