‘बाबांना घरातील महिलांनी..’; अमिताभ बच्चन यांच्या लेकीचा मोठा खुलासा

Amitabh Bachchan | बाॅलिवूडचे बिग बी म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांनी 70 80 चं दशक गाजवलं असलं तरी आज सुद्धा त्यांच्या चित्रपटाची तूफान चर्चा होत असताना दिसत असते. अमिताभ बच्चन आजही बाॅलिवूड चित्रपटात आपल्या केलेची छाप पाडत असतात. वयाच्या 80 व्या वर्षी देखील ते चित्रपटात तितकेच सक्रिय असतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब चर्चेत आहे. मात्र, त्यांच्या मुलीने एक मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाली श्वेता बच्चन?

बच्चन (Amitabh Bachchan) कुटुंब गेल्या काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणावरुण चर्चेत आहेत. सोशल मीडियावर देखील बच्चन कुटुंब ट्रोल होत असताना दिसत आहे. मात्र, बच्चन कुटुंबातील एका व्यक्तिनेच एक खुलासा केला आहे. ती ,व्यक्ति दुसरी कोणहीनसून स्वतः लेक श्वेता बच्चन आहे. श्वेताने बच्चन कुटुंबातील एक गोष्ट सांगितली आहे.

नव्या नंदाच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ च्या एपिसोडमध्ये श्वेता बच्चन म्हणाली की, “बाबांना घरातील महिलांचं केस कापणं किंवा छोटे केस ठेवणं अजिबात आवडत नाही. मात्र तरीही त्यांच्या मर्जीविरोधात जाऊन मी नेहमी माझे केस लहान कापायचे.”

या वेळी श्वेताला मुलगी नव्याने अणखी एक प्रश्न विचारलास असता त्यावर श्वेता म्हणाली की, मी नेहमीच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मर्जीविरोधात जाऊन केस लहान कापायचे. पुढे नव्या प्रश्न विचारला ती म्हणाली की, “आजोबांना हे आवडायचं नाही ना?”

नव्याने विचारलेल्या या प्रश्नचं उत्तर देत श्वेता म्हणाली की, “त्यांना त्या गोष्टीचा खूप राग यायचा. मात्र, जेव्हा मी माझे केस कापायचे, तेव्हा ते मला नेहमी म्हणायचे, हे काय केलंस तू? त्यांना छोटे केस अजिबात आवडत नाहीत. त्यांना लांब केसच आवडतात. आमच्यापैकी कोणीच केस कापलेलं त्यांना आवडायचं नाही.” असं देखील श्वेता म्हणाली.

व्हॉट द हेल नव्या-

अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेताची लेक नव्याने ‘व्हॉट द हेल नव्या’ या पाॅडकास्टचा सिझन 2 प्रेक्षकांसाठी आणला आहे.  या सिझनच्या नव्या एपिसोडमध्ये नव्याची आई म्हणजेच श्वेता बच्चनला गप्पा मारण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं.

News Title : amitabh bachchan’s daughter reveal the truth

महत्त्वाच्या बातम्या-

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाने पोस्ट करत दिली मोठी गुड न्यूज!

डेब्युमध्येच हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या सरफराजला BCCI कडून मिळालं मोठं गिफ्ट!

गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

‘या’ 3 राशींवर आज लक्ष्मी होईल प्रसन्न!

“अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत