“अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadnavis | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची जोडी सगळ्यांनाच आवडते. फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर अमृता (Amruta Fadnavis) एकदमच प्रकाशझोतात आल्या.

फडणवीस यांना राजकारणात चाणक्य म्हटले जाते. मात्र, त्यांच्या पत्नीही प्रसिद्धीच्या बाबतीत मागे नाहीयेत. मात्र, त्यांच्या वक्तव्यांमुळे बऱ्याचदा फडणवीस अडचणीतही आले आहेत. मविआ सरकार पडलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हुडी घालून रात्री बाहेर पडायचे, असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला होता. यावरच आता देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल दोन वर्षांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“अमृताने जे काही सांगितलं आहे ते खोटं आहे असं मी म्हणणार नाही. राजकीय बाबतीत माझी एक इच्छा असते अर्थात माझी तेवढी हिंमत नाही. पण त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर बरं होईल, कारण असे असे सिक्रेट त्यांनी सांगितलेत ते काय करायचं? पण तो काळ आता गेला आता काही चमत्कार करण्याची आवश्यकता नाही”, अशी मिश्किल प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

लोकमत समुहाचा महाराष्ट्रीयन ऑफ द इअर या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. याच सोहळ्यात त्यांना मविआ सरकार पडल्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यांचे आता हे विधान चर्चेत आले आहे.

३५ पुरणपोळ्यांवर फडणवीसांचे भाष्य

अमृता फडणवीस यांनी मागे एका कार्यक्रमात मोठे विधान केले होते. “माझे पती (देवेंद्र) 30 ते 35 पुरणपोळ्या आणि पातेलंभर तूप अगदी सहज खातात.”,असे झी मराठीवरील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांचे हे विधान तेव्हा बरेच चर्चेत होते. यावरही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी भाष्य केले आहे.

“35 पुरणपोळ्यांबाबत जेव्हा अमृता बोलली तेव्हा मी कुठेही गेलो की लोक माझ्यासमोर पुरणपोळ्याच ठेवायचे. आम्हाला सांगायचे वहिनींनी सांगितलंय तुम्हाला पुरणपोळ्या आवडतात. शेवटी मी जाहीर कार्यक्रमात अनेकदा सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो माझा आवडता पदार्थ पुरणपोळी नाही. कृपया मला पुरणपोळी देऊ नये.”, असा खुलासा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

News Title :  Devendra Fadnavis on Amruta Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या –

जया अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!

चांगल्या बायकोत असतात ‘या’ 3 गोष्टी, नवरा कायम राहतो खूश!

मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

डायबेटिस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांचा ऐतिहासिक निर्णय, शरद पवारांना धक्का