मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर!

Maharashtra Cabinet

Backward Class Commission Report | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव लढत आहेत. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे. मात्र आता सरकारने काही दिवसांपासून ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू न देता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा मानस सरकारचा होता. त्याचा अहवाल (Backward Class Commission Report) आता जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा समाज हा मागासवर्गीय (Backward Class Commission Report) असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने रात्रंदिवस काम केलं असून सुमारे चार लाख लोकांनी ही जबाबदारी पार पाडली आहे. हा अहवाल जलदगतीने तयार झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर केला जाईल आणि त्यानुसार 20 फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल.

मंत्रिमंडळामध्ये मागासवर्गीय अहवाल 20 फेब्रुवारीला जारी

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा मंत्रिमडळ बैठकीमध्ये ठेवला जाणार आहे. त्यामध्ये चर्चा करून शासन पुढील निर्णय घेईल. त्यासाठी 20 फेब्रुवारीला होणार आहे. अहवाल तयार करण्याच्या कामामध्ये जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त या सगळ्यांची टीम काम करत होती. जवळपास 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात आलं.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्क लागू देणार नाही

ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता तसेच समाजावर अन्याय न करता हे आरक्षण असणार आहे. समाजिक, शैक्षणिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकठीतलं आरक्षण देता येणार आहे.

कोणाचंही आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही. इतर समाजावर अन्याय करून मराठा समाजाल आरक्षण देण्याची भूमिका नाही. सर्व सामाजाला आम्ही न्याय देणार आहोत. मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या.

मराठा आरक्षणाबाबत पुन्हा आंदोलनाची गरज नव्हती. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. सुरू केलेलं हे आंदोलन त्यांनी मागे घ्यावे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

News Title – Backward Class Commission Report 

महत्त्वाच्या बातम्या

जया अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!

चांगल्या बायकोत असतात ‘या’ 3 गोष्टी, नवरा कायम राहतो खूश!

मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

डायबेटिस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांचा ऐतिहासिक निर्णय, शरद पवारांना धक्का

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .