बारामतीत अजित पवारांचा उमेदवार ठरला?; एका फोटोमुळे मोठं गुपित झालं उघड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule vs Sunetra Pawar | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. आता सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटातून लढणार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार कोणता उमेदवार देणार याबाबतची माहिती आता समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचे पडसाद मतदारांमध्ये उमटताना दिसत आहेत. बारामतीमध्ये सध्या अजित पवार यांच्या नावाची चर्चा आहे. आपल्या बहिणीविरोधात उमेदवार देणार असल्याचं ते म्हणाले. यावर आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) यांचं नाव चर्चेत आहे.

बारामतीमध्ये प्रचारासाठी एक रथ फिरत असल्याचे काही फोटो समोर आले आहेत. त्यावर एका कोपऱ्यामध्ये अजित पवार यांचा फोटो आहे. तर मध्यभागी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे. यामुळे आता बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Supriya Sule vs Sunetra Pawar)

अजित पवार हे बारामतीचे आमदार आहेत. त्यामुळे अजित पवार यांची ताकद मोठी असल्याचं बोललं जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्या माहिती आणि कार्याचा प्रचार करणारा रथ बारामतीमध्ये फिरताना दिसत आहे. यामुळे सुनेत्रा पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित केली असून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांचा उमेदवार ठरला ? प्रचाराचा रथ फिरणार

नणंद विरूद्ध भाऊजय अशी चुरस बारामती लोकसभा मतदारसंघात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांआधी आता कितीवेळा थोरांचं ऐकायचं. आता मी जो उमेदवार देईल त्या उमेदवारास मत द्या, असं विधान त्यांनी केलं.

सुनेत्रा पवारांकडून कुल कुटुंबियांची भेट

सुनेत्रा पवार यांनी भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल आणि 2019 च्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या घरी जात सदिच्छ भेट घेतली आहे. दौंड तालुक्यातील राहू येथे सुनेत्रा पवार यांनी कुल कुटुंबियांची भेट घेतली आहे.

अष्टविनायक महागणपती दर्शन

अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार हे सध्या अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे दर्शन घेत बाप्पाची आरती केली. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचा शिरूर मतदारसंघाचा निवडणूक दौरा वाढला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पराभूत करणार असं आव्हान दिल्यानंतर सुनेत्रा पवारही शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या फिरताना दिसत आहेत.

News Title – Supriya Sule Vs Sunetra Pawar Baramati Assembly Election

महत्त्वाच्या बातम्या