Nilesh Rane vs Bhaskar Jadhav | गुहागर येथे 16 फेब्रुवारीला भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांची सभा होती. या सभेपूर्वी चिपळूण येथे मोठा राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये निलेश राणे (Nilesh Rane vs Bhaskar Jadhav) यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. यामुळे आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत. अशातच निलेश राणे यांची गुहागर येथे सभा होती आणि याच सभेआधी निलेश राणेंचे (Nilesh Rane) कार्यकर्ते आणि भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला आहे. यासभेमुुळे मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र चिपळूण येथे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ निलेश राणे यांचे स्वागत करण्यात आल्याने भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यातील एक दगड निलेश राणे यांच्या गाडीवर भिरकावला गेला.
निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने चिपळूणमध्ये वातावरण तापले आहे. याचा वचपा निलेश राणे पुन्हा कधी काढतील? हे सांगता येणार नाही. त्यांच्या गाडीवर दगडफेक होताच निलेश राणे गाडीतून उतरले आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांच्या अंगावर गेले. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि निलेश राणे त्या ठिकाणावरुन निघून गेले.
जाधव-राणे जुना वाद-
भास्कर जाधव आणि नारायण राणे (Nilesh Rane vs Bhaskar Jadhav) हा गेली बारा वर्षांपासून जुना वाद आहे. एकदा भास्कर जाधव त्यांच्या एका सभेमध्ये नारायण राणेंना कोंबडी चोर असं म्हणाले होते. तसेच कणकवलीमध्ये देखील भास्कर जाधव यांनी राणेंवर टीका केली होती. तेव्हापासून त्या दोघांच्यात वाद असल्याचं पहायला मिळतंय.
पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह-
भास्कर जाधव आणि राणे यांच्यामध्ये जुना वाद आहे. हे माहीत असूनही पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी येणं गरजेचं होतं, मात्र तसं झालेलं दिसलं नाही.
चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर निलेश राणे यांचं स्वागत करण्यासाठी परवानगी दिल्याने हा राडा झाला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद हे येत्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यभर उमटण्याची चिन्हे आहेत.
News Title: Nilesh Rane vs Bhaskar Jadhav
महत्त्वाच्या बातम्या
जॉनी सीन्सला स्वत: रणवीरने केली होती ‘ही’ विनंती
शाहरूख खानच्या चाहत्यांना धक्का, मोठा निर्णय घेणार
बारामतीत अजित पवारांचा उमेदवार ठरला?; एका फोटोमुळे मोठं गुपित झालं उघड
‘बाबांना घरातील महिलांनी..’; अमिताभ बच्चन यांच्या लेकीचा मोठा खुलासा
मेधा कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीनं पुणे लोकसभेची गणितं बदलली!