“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad | आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांचं विरोधकांवर तर विरोधकांचं सत्ताधारी पक्षावर टीका करणं सुरू आहे. अशातच आपल्या काकांनी स्थापन केलेल्या पक्षावर पुतण्याने दावा सांगितला आणि निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने दिला आहे. यावरून आता शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, “आपण विरोधकांच्या बाकावर जात भाषण करता. भाषण करायला मांडणी लागते, अभ्यास लागतो आणि माहिती लागते. पीएनं भाषणात विरोधकांवर लिहून दिलेल्या टीका तुम्ही बाजूला काढत होता. तुमच्या वर्तणुकीचे आम्ही साक्षीदार आहोत”, अशा कडक शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

आमच्या काय पोटात दुखतंय निवडणूक लढायची होती तर तुम्ही ती कायद्याच्या बाजूनं लढायची होती. तुम्ही अनेकदा स्टेजवरून पळून जायचा. तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. दिल्लीला भाषण करायच्या वेळी आपण बाथरूममध्ये असायचात, असा मिश्कील टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. राजीनामा द्यायचे. एमएससी बँकेमध्ये केलेले लोच्चे, आलं शरद पवारांवरती”. अशी टीका करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना धारेवर धरलं आहे.

“इतका कृतघ्न माणूस आजपर्यंत…”

“तुम्हाला चार वेळा उपमुख्यमंत्री पद हे केवळ शरद पवार यांच्यामुळे मिळाले आहे. याचे मनात उपकार तर ठेवा. कृतज्ञता दाखवा. इतका कृतघ्न माणूस आजपर्यंत राजकारणात नाही. परत त्यांना रक्ताचं नातं जोडायचं आहे. मी तुमच्या काकाचा मुलगा होतो ना? अरे तू काकाचा मुलगा होता, म्हणून चारवेळा उपमुख्यमंत्री झाला आहे”. असा शाब्दिक हल्ला जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

“तु त्यांच्या भावाचा मुलगा होतास म्हणून त्यांनी तुला माफ केलं. मागास जातीच्या जितेंद्र आव्हाडाने जर असं काही केलं असतं तर आमच्या मागच्या भागावर लाथ मारून आम्हाला हकलून दिलं असतं. हे बोलत असताना वाईट वाटतंय. एवढं वर्षे काम करूनही या माणसाला शरद पवार यांची ओळख पटली नाही”.

“शरद पवारांना डसू नका”

“जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बोलत असताना ओबीसी, एसटी, एनटी, एस्सी निधी थांबवण्याचं काम हे अजित पवार यांनी केलं आहे. जातियवाद पाळणारा मंत्री हा अजित पवार आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचे आणि तुमचे संबंध कसे होते हे आम्हाला माहिती नाही का? तुम्ही सत्तेसाठी एकत्र आलात आहात. एकत्र राहा पण शरद पवारांना डसू नका,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

खालील व्हिडीओ नक्की पाहा-

News Title – Jitendra Awhad Aggressive On Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत अजित पवारांचा उमेदवार ठरला?; एका फोटोमुळे मोठं गुपित झालं उघड

‘बाबांना घरातील महिलांनी..’; अमिताभ बच्चन यांच्या लेकीचा मोठा खुलासा

मेधा कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीनं पुणे लोकसभेची गणितं बदलली!

प्रसिद्ध अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, बॉलिवूडवर शोककळा!

सुंदर आणि तजेलदार त्वचा हवीये?, मग रोज करा ‘या’ फळांचं सेवन