टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर

IND vs ENG | भारत-इंग्लंडमध्ये (IND vs ENG) सध्या कसोटी मालिका सुरू आहे. काल (16 फेब्रुवारी) त्यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू असताना राजकोटमध्ये इतिहास रचला गेला. भारताचा सीनियर स्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) 500 विकेट पूर्ण केल्या आहेत. हा रेकॉर्ड करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. अश्विनच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. याची दखल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली.

पंतप्रधान मोदींनी ( Narendra Modi ) या संदर्भात ट्वीटरवर पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी या क्षणाची दखल घेत भारतीय खेळाडूला शुभेच्छा दिल्या. त्यांचं हे ट्वीट आता चांगलेच व्हायरल होत आहे. देशाचा कारभार करताना आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात मोदी कधीच मागे राहत नाहीत. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे ते नेहमी कौतुक करत असतात.

गेल्या वर्षी जेव्हा टीम इंडिया फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली होती, तेव्हा देखील मोदी भारतीय क्रिकेट संघाला भेटण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये गेले होते. सर्व खेळाडूंना त्यांनी धीर दिला होता. याचा व्हिडिओ तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. आता त्यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा-

“करीअरमध्ये 500 विकेट घेऊन, हा जो असामान्य महत्त्वाचा टप्पा गाठलाय, त्याबद्दल अश्विन तुला शुभेच्छा. अश्विनचा हा जो प्रवास आहे, कर्तुत्व आहे, त्यातून त्याचं कौशल्य आणि चिकाटीची साक्ष मिळते. माझ्या मनापासून अश्विनला शुभेच्छा, त्याने करीअरमध्ये अजून उंची गाठावी”, असे ट्वीट मोदी यांनी केले आहे.

तर, रेकॉर्डबद्दल (IND vs ENG) अश्विनला विचारलं तेव्हा तो म्हणाला की, “याच सरळ उत्तर नाहीय. हा रेकॉर्ड 120 विकेट दूर आहे. मला प्रत्येक दिवस जगायच आहे. मी 37 वर्षांचा आहे. पुढे काय होणार हे मला माहित नाही”

रविचंद्रन अश्विनने केला रेकॉर्ड

स्पिनर रविचंद्रन अश्विनने 500 विकेट पूर्ण करत नवीन रेकॉर्ड केला आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये (IND vs ENG) सर्वाधिक 619 विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे.अश्विनने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्यादिवशी 500 विकेट पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने मीडियाशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली.

News Title :  IND vs ENG Narendra Modi praised Ravichandran Ashwin

महत्त्वाच्या बातम्या-

जॉनी सीन्सला स्वत: रणवीरने केली होती ‘ही’ विनंती

शाहरूख खानच्या चाहत्यांना धक्का, मोठा निर्णय घेणार

बारामतीत अजित पवारांचा उमेदवार ठरला?; एका फोटोमुळे मोठं गुपित झालं उघड

‘बाबांना घरातील महिलांनी..’; अमिताभ बच्चन यांच्या लेकीचा मोठा खुलासा

मेधा कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीनं पुणे लोकसभेची गणितं बदलली!