अजित पवार म्हणाले मला कुटुंबानं एकटं पाडलं…. अखेर शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar vs Ajit Pawar | बारामतीमध्ये अजित पवार यांचा बूथ कमिटी मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यामध्ये कुटुंबाने मला एकटं पाडलं आहे. सर्वजण माझ्याविरोधात प्रचार करतील. मात्र मला तुमची साथ हवी आहे. अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं, यावर आता शरद पवार (Sharad Pawar vs Ajit Pawar) पलटवार केला आहे.

“पक्ष आणि चिन्ह निकाल सेटलमेंट”-

पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांनी बारामतीमध्ये उपस्थिती दाखवली. माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. चिन्ह आणि पक्षाचा दिलेला निर्णय हा आमच्यावर अन्यायकारक आहे. पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकाल हा सेटलमेंट असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.

“भावनात्मक आपील करण्याचं कारण नाही. कारण बारामतीकर वर्षानुवर्षे ओळखत आले आहेत. यामुळे आपल्याला भावनात्मक आपील करायची गरज नाही. पण विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते. बारामतीकर त्यांची नोंद घेतील”, असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

अजितदादांच्या वक्तव्याचा समाचार-

शरद पवार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे. उमेदवार कोणीही असला तरीही त्याला मतदारांना साथ मागण्याचा अधिकार आहे. मात्र ‘कुटुंब माझ्या विरोधात आणि मी एकटा पडलोय’, असं भासवणं म्हणजे सहानुभूती मिळवण्याचं काम सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

“माझ्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत. कार्यकर्त्यांना धमकावलं जात आहे. टेलिफोन येत आहे. मी तुम्हाला पदावर बसवलं, असं सांगितलं जात आहे. असं कधी बारामतीमध्ये पाहायला मिळालं नव्हतं, हे आता पाहायला मिळालं आहे”. त्यानंतर त्यांनी बारामतीतील सभेवर भाष्य केलं असून सभेला अजून वेळ असल्याचं ते म्हणाले.

काय म्हणाले होते अजितदादा?-

बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवार हे भावनिक झाले होते. “सध्या एक वरिष्ठ पुण्यात आहेत आणि एक वरिष्ठ इथंच आहे. माझा परिवार सोडला तर सर्वजण मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत असून माझ्याविरोधात प्रचार करतील. घरातील सर्वजण माझ्या विरोधात गेले तरीही तुम्ही सर्व माझ्या बरोबर आहात. तुमचा पाठिंबा आणि तुमची एकजूट असेल तोपर्यंत मी माझं काम असंच सुरू ठेवेल,” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

News Title – Sharad Pawar Vs Ajit Pawar political news update

महत्त्वाच्या बातम्या

“..तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेन”; खळबळजनक आरोप करत ‘या’ नेत्यानं दिलं थेट आव्हान

पुण्यात मोठ्या घडामोडी!; लोकसभेसाठी भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याचं तिकीट फायनल?

टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर

“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक, चिपळूणमध्ये नेमका काय राडा घडला वाचा सविस्तर…