“..तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेन”; खळबळजनक आरोप करत ‘या’ नेत्यानं दिलं थेट आव्हान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने निशाणा साधला आहे. शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून सतत एकमेकांवर आरोप केले जातात. आता थेट उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत शिंदे गटाच्या नेत्याने मोठी मागणी केली आहे.

एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि अत्यंत विश्वासू असे रामदास कदम यांनीच उद्धव ठकरेंची ईडी चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचारी कोण आहे हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हानही दिलं आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. पण उद्धव ठाकरे कायम त्यांच्यवर टीका करतात. आमची मंत्रिपदे काढली. ज्यांच्या भाषणाला जास्त टाळ्या येतील, त्यांना दूर केलं. भाषणे बंद करून टाकली. माझी आमदारकी काढली. माझं मंत्रिपद काढलं. मी मिठाई देण्यात कमी पडलो, नाहीतर मंत्री असतो. रवींद्र वायकर का मंत्री झाले? हे वायकरांनी सांगावं? दिवाकर रावतेही सांगू शकतील, असे रामदास कदम म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करण्याची संधी मला मला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण आत्ता जे महाराष्ट्रात बाप-बेटे दोघेजण बडबड करत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्याचं पिल्लू, यांचं बोलणं, वागणं आणि टोमणे हे पाहिले तर एखादा दिवा विझताना जसा फडफडतो तशी फडफड या दोघांची सुरु आहे. असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा, याला त्याला ईडी लावण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे. आतापर्यंत दिलेले सर्व खोके कुठे गेले? ते सर्व बाहेर आले पाहिजे. भ्रष्टाचारी कोण आहे ते महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे, अशी मागणीच रामदास कदम यांनी केली आहे.

“..तर मी ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेन”

“अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी महाराष्ट्राचा नालायक मुख्यमंत्री कोण ठरलं असेल तर हा माणूस. 40 पैकी एकाही आमदाराने 50 खोके घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन आणि हे सिद्ध नाही झालं तर त्यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी”, असं आव्हानच रामदास कदम यांनी केलं आहे.

News Title :  Ramdas Kadam challenge to Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

जॉनी सीन्सला स्वत: रणवीरने केली होती ‘ही’ विनंती

शाहरूख खानच्या चाहत्यांना धक्का, मोठा निर्णय घेणार

बारामतीत अजित पवारांचा उमेदवार ठरला?; एका फोटोमुळे मोठं गुपित झालं उघड

‘बाबांना घरातील महिलांनी..’; अमिताभ बच्चन यांच्या लेकीचा मोठा खुलासा

मेधा कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीनं पुणे लोकसभेची गणितं बदलली!