Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांना वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. मागेही त्यांना याबाबत नोटीस देण्यात आली होती.
तेव्हा पंकजा मुंडे यांच्यावर कार्यकर्त्यांनी भरभरून प्रेम दाखवले होते. पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावागावातून पैसे गोळा केले होते. तेव्हा त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करून सर्वच कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. आता त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांचा पीएफ थकवला आहे. याची किंमत तब्बल 61 लाख 47 हजार आहे. ही रक्कम न भरल्यामुळे शुक्रवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा हा साखर कारखाना काही न काही कारणांमुळे बंद आहे. त्यामुळे या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली नाही. त्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे. आता यासंदर्भात पुढे काय होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पंकजा मुंडेंकडून भावनिक आवाहन
मागे जेव्हा त्यांना या बाबतीत नोटिस देण्यात आली होती, तेव्हा कार्यकर्त्यांनी पैसे जमा केले होते. यामुळे पंकजा मुंडे खूपच भारावून गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी भावनिक आवाहन केले होते. तुमचे प्रेम माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अकाऊंटमध्ये जमा करा. तेच आवश्यक आहे. तुमच्याकडून रक्कम घेणं मला पटत नाही. माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही. त्यामुळे त्या रकमा घरी ठेवा आणि प्रेम माझ्या अकाऊंटमध्ये जमा करा.असे तेव्हा पंकजा मुंडे (Pankaja Munde ) म्हणाल्या होत्या.
दरम्यान काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्या विधानाचीही चर्चा होताना दिसते. माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला. पण मला त्याचा फायदा झाला. मला आता लोक दहापट जास्त प्रेम करतात. तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे. असे पंकजा म्हणाल्या होत्या. आपल्या मनातील सल त्यांनी बोलून दाखवली होती. आता या नोटीसीमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
News Title- Notice to sugar factory of Pankaja Munde
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर
“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक, चिपळूणमध्ये नेमका काय राडा घडला वाचा सविस्तर…
मोठी बातमी- धनगर आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय