‘दंगल’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप, मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Suhani Bhatnagar | बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे. अभिनेता आमिर खान याच्या ‘दंगल’ या चित्रपटातील अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. या चित्रपटात फातिमा सना, सान्या मल्होत्रा, सुहानी भटनागर, साक्षी तंवर यांच्या मुख्य भूमिका होत्या. यामधीलच लोकप्रिय अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचं निधन झालं आहे.

वयाच्या 19 व्या वर्षा तिने अखेरचा श्वास घेतला आहे. सुहानीवर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी सुहानीचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारात दिलेल्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे सुहानीचे संपूर्ण शरीर पाण्याने भरले होते. एम्स रुग्णालयात ती उपचार घेत होती.

सुहानी भटनागरचं निधन

काल (17 फेब्रुवारी) तिने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीचे (Suhani Bhatnagar) अंतिम संस्कार फरीदाबाद येथे केले जाणार आहे. अवघ्या 19 व्या वर्षी सुहानीने जगाचा निरोप घेतला. या बातमीमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलीवुडसह सोशल मिडियावर याबाबत शोक व्यक्त केला जात आहे.

सुहानीच्या आई-वडिलांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. तिला ‘दंगल’ या चित्रपटापासून प्रसिद्धी मिळाली होती. करिअरची आता कुठे सुरुवात झाली होती. एवढ्या लवकर तिचे निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुहानीला ‘दंगल गर्ल’ म्हणूनही ओळखले जाई.

कोण आहे सुहानी भटनागर ?

सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट दंगल (2016) मधील बबिता फोगटच्या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टेलिव्हिजन जाहिरातींमध्येही काम केले. यामध्ये सुहानीने बबीताचा बालपणीचा रोल केला होता.

‘दंगल’नंतर सुहानीला (Suhani Bhatnagar) अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. अनेक मुलाखतींमध्ये सुहानीने सांगितले होते की, तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीत परतण्याची योजना आखली आहे.

मात्र, काही आजारामुळे सुहानीवर उपचार सुरू होते. याचमुळे वयाच्या 19 व्या वर्षीच तिला मृत्यूला सामोरे जावे लागेल. सुहानीच्या निधनाच्या बातमीमुळे सर्वत्रच शोक व्यक्त केला जात आहे.

News Title :  Suhani Bhatnagar passed away

महत्त्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं गुपचुप उरकला साखरपुडा; फोटो आले समोर

“..तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेन”; खळबळजनक आरोप करत ‘या’ नेत्यानं दिलं थेट आव्हान

पुण्यात मोठ्या घडामोडी!; लोकसभेसाठी भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याचं तिकीट फायनल?

टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर

“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?