वयाच्या चाळीशीतही दिसायचंय तरुण?, मग ‘हे’ फॉलो कराच…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Health Tips | पुरुषांपेक्षा महिला लवकर वृद्ध दिसून येतात. महिलांच्या चेहऱ्यावरून त्यांचे वय दिसून येते. मात्र, याबाबतीत पुरुषांचे वेगळे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून लवकर वयाचा अंदाज येत नाही. महिला तरुण (Health Tips) दिसण्यासाठी अॅंटी एजिंग क्रीम वापरतात. महागडे उपचार घेतात. मात्र, तरीही त्याचा काही फरक दिसून येत नाही.

आता तुम्हालाही जर वयाच्या चाळीशीत तरुण दिसायचे असेल तर काही टिप्स फॉलो (Skin Care Tips) करणं गरजेचं आहे. महिलांच्या वयाच्या 30 शी नंतर त्यांच्यात शारीरिक अनेक बदल होत असतात. चेहऱ्यावरील तजेलपणा, चमक कमी कमी होत जाते. त्यामुळे यानंतर शरीराची काळजी अधिक घ्यावी लागते.

इतकंच नाही तर वयाच्या 30 व्या वर्षांनंतर खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्या शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम आणि लोह कमी होऊ लागते. त्यामुळे डोळ्यांची नजर कमी होणे, गुडघेदुखी अशा समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे अॅंटी ऑक्सीडेंटने भरपूर पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यायला हवे. आता हे पदार्थ कोणते, याबाबत तुम्हाला इथे सविस्तर माहिती दिली आहे.

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे

जसजसे तुमचे वीवय वाढेल तसतसे (Health Tips) तुम्ही जास्त प्रमाणात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे तुमची चयापचय क्रिया मजबूत राहते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. हे रक्तातील साखरेची पातळी बरोबर राखण्यास देखील मदत करते आणि वजनदेखील नियंत्रणात ठेवते.

हार्मोन्स संतुलित करणारे अन्न

हार्मोनल असंतुलनाची समस्या या वयात झपाट्याने वाढते. त्यामुळे ती नियंत्रणात ठेवणे (Health Tips) अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अश्वगंधा, तुळशी, ब्रोकोली, ग्रीन टी, सफरचंद, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, ब्लू बेरी यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे.

लोहयुक्त पदार्थ खाण्यास प्राधान्य देणे

महिलांमध्ये या वयात एक सामान्य समस्या आढळते, ती म्हणजे लोहाची कमतरता. यामुळे थोडेसे काम केल्यावर थकवा येऊ लागतो. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे हा अशक्तपणा सुरू होतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी हिरव्या भाज्या, वाटाणे, भोपळ्याचे दाणे, बेदाणे, गूळ, बीटरूट, गाजर इत्यादी लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते.

कॅल्शियमयुक्त पदार्थ

वाढत्या वयाबरोबर शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे (Health Tips) आपली हाडे कमकुवत होऊ लागतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दूध, दही, पनीर, बदाम, ब्रोकोली इत्यादींचा समावेश करू शकता.या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही तरुण दिसाल.

News Title : Health tips to look younger
महत्त्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं गुपचुप उरकला साखरपुडा; फोटो आले समोर

“..तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेन”; खळबळजनक आरोप करत ‘या’ नेत्यानं दिलं थेट आव्हान

पुण्यात मोठ्या घडामोडी!; लोकसभेसाठी भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याचं तिकीट फायनल?

टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर

“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?