“पक्ष हातातून गेला!”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळ भडकले

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal | निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांचं आहे, असा निकाल जाहीर केला. यावरून आता शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. पक्ष आणि चिन्ह आमचं असून निवडणूक आयोगाने अन्याय केलं असल्याचा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे. पक्ष हातून गेल्यानंतर शरद पवार हे बारामतीमध्ये प्रथमच आले असताना त्यांनी ही टीका केली. यावर आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

“निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत आहे की नाही… तुम्ही सुप्रीम कोर्टात जात आहात की नाही? सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश बसले आहेत. ते ठरवतील त्यांच्या म्हणण्यप्रमाणे जे असेल ते उत्तर मिळेल. काय निर्णय घेतील, ते सांगितलं ना… सुप्रीम कोर्टामध्ये जात आहात तर जा.” असं म्हणत भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड टार्गेट-

शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर ओबीसी निधीवरून टीका केली होती. याप्रकरणावर त्यांनी आता जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट केलं आहे. “मला जर त्यांनी डीटेल्स दिली. तपशील दिला तर विचारण्यात येईल, मला तर तसे काहीही माहिती नाही. त्यांच्याकडे एखादी फाईल दिली तर ती लगेचच मार्गी लागतो”.

मनोज जरांगेंवर छगन भुजबळांची टीका-

मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यावर आता भुजबळांनी भाष्य केलं आहे. “त्यांची संस्कृती आहे तो मोठा नेता आहे. तिकडं झोपणार अन् सांगणार हे झालं पाहिजे अन् ते झालं पाहिजे. काय चाललं आहे. दुकाने बंद करा, गाड्या जाळा… हे काय टोळ्यांचं राज्य आहे का?” असा सवाल छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

“बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे. हे पोलिसांनी आणि मंत्र्यांनी दाखवून दिलं पाहिजे. कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही. कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही. कायदा हातात कोणी घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो कोणताही नेता असो. लहान असो वा मोठा नेता असो त्याला कोणताही मुद्दा नाही”, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्हाप्रती निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार हे बारामतीमध्ये प्रथमच आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांनी परिवाराबाहेर टाकत माझ्याविरोधात प्रचार केला जाईल असं वक्तव्य केलं होते. त्यावर देखील शरद पवार यांनी टीका केली होती.

News Title – Chhagan Bhujbal On Sharad Pawar 

महत्त्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं गुपचुप उरकला साखरपुडा; फोटो आले समोर

“..तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेन”; खळबळजनक आरोप करत ‘या’ नेत्यानं दिलं थेट आव्हान

पुण्यात मोठ्या घडामोडी!; लोकसभेसाठी भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याचं तिकीट फायनल?

टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर

“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .