एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी, पाहा मुख्यमंत्र्यांसोबत नेमका काय प्रसंग घडला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळालं. यानंतर कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिलं अधिवेशन पार पडलं आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाने एकनाथ शिंदे भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या, त्यांनी स्वत: ट्वीट करत आपलं मन हलकं केलं आहे. ((बातमीच्या शेवटी व्हिडीओ आहे, तो आवर्जुन पाहा))

एकनाथ शिंदे यांचं ट्वीट

“‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटुबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले.”


“शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला”.

“सगळा प्रवास झरकन् डोळ्यासमोरून निघून गेला. त्याचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो होतो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटुबही पुरते हेलावून गेले होते. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटुंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते”.

 

श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्यात पाणी-

कोल्हापूर येथे शिवसेनेचं एकदिवसीय महाअधिवेशन पार पडलं आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अधिवेशनामध्ये भाषण केलं. भाषण करत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्याबाबत सांगितलं. “आनंद दिघेंच्या जाण्यानं एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा आधार बनले आहेत. शिंदेसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपलं मानलं. त्यानंतर काहीही झालं तरीही सर्वप्रथम पोहोचणारे म्हणजे शिंदेसाहेब”, म्हणत श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळले.

एकनाथ शिंदे यांचं पहिलंच महाअधिवेशन-

शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदे यांचं असल्याचा निकाल बंड केल्यानंतर निवडणूक आयोगाने दिला होता. यामुळे आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं असून त्यानंतर शिवसेनेचा पहिला अधिवेशन सोहळा कोल्हापूर येथे पार पडत आहे. एकनाथ शिंदे यांचा आतापर्यंतचा प्रवास श्रीकांत शिंदे यांनी जवळून पाहिला आहे. त्याबाबत त्यांनी या महाअधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेंप्रती आपल्या भावना आणि त्यांच्या कार्याबाबत आपल्या भाषणातून संबोधित केलं.

खालील व्हिडीओ नक्की पाहा-

News Title –  Eknath shinde & Shreekant Shinde speech at kolhapur

महत्त्वाच्या बातम्या 

टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर

“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक, चिपळूणमध्ये नेमका काय राडा घडला वाचा सविस्तर…

मोठी बातमी- धनगर आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय

जॉनी सीन्सला स्वत: रणवीरने केली होती ‘ही’ विनंती