“आज बाळासाहेब ठाकरे असते तर…”, शिंदेंकडून मोदींचे कौतुक, ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नक्कीच कौतुक केले असते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राम मंदिर आणि कलम ३७० वरून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे शिंदे सातत्याने ठाकरेंवर हिंदुत्वाचा दाखला देत टीका करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी यावरून ठाकरेंना डिवचले आहे. ते कोल्हापूर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात बोलत होते. खासदार श्रीकांत शिंदे यांचे भाषण ऐकताना मुख्यमंत्री भावूक देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

शिंदेंकडून मोदींचे कौतुक

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक केले असते. राम मंदिराचा विकास आणि कलम ३७० रद्द करण्यावरून त्यांनी मोदींना दाद दिली असती. पण, त्यांना (उद्धव ठाकरे) हिंदुत्वावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला खऱ्या हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. महाराष्ट्रातील जनता आम्हाला मतदान करेल कारण आम्हीच खरी शिवसेना आहोत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातली जनता उद्धव ठाकरेंना निवडणुकीत मतदान करणार नाही आणि त्यांना डस्टबिनमध्ये फेकून देईल. आम्हीच खरी शिवसेना आहोत. उद्धव ठाकरेंच्या गटातील मंडळी बनावट शिवसेना आहे.

 

Eknath Shinde यांची ठाकरेंवर टीका

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान हेच आपले उमेदवार आहेत असे समजून पूर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. एकनाथ शिंदेंनी या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अभिनंदनाचा ठराव केला.

दरम्यान, शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही दीड वर्षांपूर्वी हे धाडस केले होते उलट तुम्ही जनमताचा अनादर करून पहिल्यांदा आणि मोदींना दिल्लीत खोटे आश्वासन देऊन दोनदा गद्दारी केल्याचे सांगितले. खोके खोके म्हणून डिवचणाऱ्यांना खोके नव्हे कंटेनर लागायचे हे मला माहित आहे. आमच्यावर आरोप करताना लाज वाटायला हवी असे. बाळासाहेब असेपर्यंत मातोश्री हे मंदिर होते, मात्र आता ते भकास झाले आहे. तिथून फक्त शिव्याशाप ऐकायला मिळत आहेत. माझ्या दाढीवर घसरलात पण या दाढीला तुमच्या नाड्या चांगल्या ठाऊक आहेत, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

News Title- Chief Minister Eknath Shinde has said that if Balasaheb Thackeray were present today, he would have praised Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या –

एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी, पाहा मुख्यमंत्र्यांसोबत नेमका काय प्रसंग घडला

“पक्ष हातातून गेला!”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळ भडकले

वयाच्या चाळीशीतही दिसायचंय तरुण?, मग ‘हे’ फॉलो कराच…

पाण्याच्या बिझनेसमधून करा लाखोंची कमाई, जाणून घ्या सर्व माहिती एकाच ठिकाणी

अजित पवार म्हणाले मला कुटुंबानं एकटं पाडलं…. अखेर शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं!