“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणेंसारख्या गुंडांपासून भास्कर जाधवांना सरंक्षण द्यावे”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nilesh Rane | माजी खासदार निलेश राणे हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तापट स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या निलेश राणेंनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. चिपळूणमध्ये राडा झाल्यानंतर जाहीर सभेत बोलताना त्यांनी भास्कर जाधवांना शिवीगाळ केली. तसेच भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याने निलेश राणेंवर विरोधक टीका करत आहेत. शुक्रवारी सायंकाळी चिपळूणमध्ये निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आणि वाद चिघळला.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी निलेश राणेंच्या धमकीनंतर माझ्या जीवाला काही झाल्यास निलेश राणे जबाबदार असतील असे सांगितले आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राणेंवर टीका करताना भास्कर जाधवांना सुरक्षा देण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

चिपळूणमध्ये राडा

त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, भाजपा मेळाव्यात नेत्यांनी केलेली ही भाषणं बघून हा भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा कार्यक्रम आहे असा प्रश्न पडतो. भाजपच्या व्यासपीठावरून झालेल्या या भाषणाची 2 मिनिटांची क्लिप अत्यंत बोलकी आहे. राज्यातील जनतेला आणि कायदा सुव्यवस्थेला खरा धोका हा भाजपकडूनच आहे, हे चित्र स्पष्ट आहे.

तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझी मागणी आहे की, त्यांनी तातडीने आमदार भास्कर जाधव यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना स्वतःच्या पक्षातील गुंडांपासून संरक्षण द्यावे. भाजपच्या एका आमदाराने पोलीस स्थानकात गोळ्या झाडण्याच्या घटनेला दोन आठवडे उलटत नाही तेच पुन्हा आता इतर भाजपचे नेते थेट व्यासपीठावरून विरोधकांना जीवे मारायची धमकी देत आहे, यावर वेळीच लगाम घातली गेली पाहिजे, असे वडेट्टीवारांनी नमूद केले.

Nilesh Rane यांच्यावर जाधवांचे आरोप

चिपळूणमध्ये शुक्रवारी सायंकाळी मोठा राडा झाला. राणे समर्थक आणि भास्कर जाधव यांचे समर्थक आमनेसामने आले. पोलिसांची मोठी कुमक असताना देखील कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. खरं तर शुक्रवारी रात्री निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा झाली. यासाठी ते गुहागरला निघाले होते. वाटेत त्यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर थांबला. तिथे घोषणाबाजी सुरू झाल्याने वाद चिघळला.

चिपळूमधील राड्यावर भास्कर जाधव म्हणाले की, सगळा घटनाक्रम पाहा… पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यापूर्वी सीसीटीव्ही फुटेज तपासायला हवे. आम्ही पोलिसांना पूर्वीच अस काहीतरी घडणार याची कल्पना दिली होती. त्याची दखल त्यांनी घेतली का? माझ्या कार्यालयासमोर मुद्दाम पोस्टर, बॅनर आणि झेंडे लावले गेले. आमच्या प्रथेप्रमाणे आम्ही त्यांच्या एकाही पोस्टरला अथवा बॅनरला हात लावला नाही. पण त्यांनी मुद्दामहून राडा केला, अशी टीका जाधवांनी केली.

News Title- Leader of Opposition Vijay Vattettiwar has demanded action from Devendra Fadnavis after former MP Nilesh Rane threatened to kill MLA Bhaskar Jadhav
महत्त्वाच्या बातम्या –

“आज बाळासाहेब ठाकरे असते तर…”, शिंदेंकडून मोदींचे कौतुक, ठाकरेंवर घणाघात

एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी, पाहा मुख्यमंत्र्यांसोबत नेमका काय प्रसंग घडला

“पक्ष हातातून गेला!”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळ भडकले

वयाच्या चाळीशीतही दिसायचंय तरुण?, मग ‘हे’ फॉलो कराच…

पाण्याच्या बिझनेसमधून करा लाखोंची कमाई, जाणून घ्या सर्व माहिती एकाच ठिकाणी