IPL 2024 पूर्वी ‘मुंबई’चा जलवा! पोलार्डच्या नेतृत्वात जिंकला ILT20 चा किताब, दुबई चीतपट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

ILT20 Final | मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने आणखी एक किताब जिंकला आहे. MI Emirates ने आंतरराष्ट्रीय लीग टी-20 (ILT20) 2024 चे विजेतेपद पटकावले. मुंबई संघाने अंतिम फेरीत दुबई कॅपिटल्सचा 45 धावांनी पराभव केला. (MI Emirates Won International League T20 2024) विजेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना MI ने निर्धारित 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या. (International League T20 2024) संघासाठी कर्णधार निकोलस पुरनने 27 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 57 धावा केल्या. याशिवाय आंद्रे फ्लेचरने 53 धावा कुटल्या.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना दुबई कॅपिटल्सला 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 163 धावा करता आल्या. संघासाठी कर्णधार सॅम बिलिंग्जने 29 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावांची सर्वात खेळी खेळली, मात्र तो संघाला विजयाची रेषा ओलांडण्यास मदत करू शकला नाही. यादरम्यान एमआयकडून विजयकांत, वायकांत आणि ट्रेन्ट बोल्ट यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.

पोलार्डच्या नेतृत्वात जिंकला किताब

209 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दुबई कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली. कारण डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लूक डू प्लॉय स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर टॉम एबेल आणि टॉम बँटन यांनी दुसऱ्या बळीसाठी 37 धावांची भागीदारी केली. पण ही चांगली भागीदारी पाचव्या षटकात टॉम एबेलच्या बळीसह संपुष्टात आली, जो 16 चेंडूत 14 धावा काढून बाद झाला. यानंतर टॉम बँटनही आठव्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. चांगल्या लयनुसार खेळत असलेला बँटन 20 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 35 धावा करून बाद झाला.

त्यानंतर कर्णधार सॅम बिलिंग्ज आणि सिकंदर रझा यांनी काही काळ डाव सांभाळला आणि 38 धावांची भागीदारी नोंदवली. दोघांची ही भागीदारी 13व्या षटकात सिकंदर रझाच्या बळीने संपली, जो 13 चेंडूत केवळ 10 धावा काढून बाद झाला. त्यानंतर 14व्या षटकात कर्णधार सॅम बिलिंग्ज देखील पॅव्हेलियनमध्ये परतला. दुबईच्या कर्णधाराने 29 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या.

 

ILT20 Final मध्ये एमआय एमिरेट्सचा विजय

दरम्यान,17व्या षटकात रोव्हमन पॉवेल केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर 19व्या षटकात जेसन होल्डर ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. होल्डरने 16 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार लगावत 24 धावा केल्या. अखेर दुबईचा संघ निर्धारित षटकांमध्ये केवळ 163 धावा करू शकला.

तगड्या आव्हानाचा बचाव करण्यात एमआय एमिरेट्सला यश आले. त्यांनी प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत खास कामगिरी केली. विजयकांत, वायकांत आणि ट्रेन्ट बोल्ट यांनी संघाकडून सर्वाधिक 2-2 बळी घेतले. याशिवाय अकील हुसैन, मोहम्मद रोहीद खान आणि वकार सलामखिल यांना प्रत्येकी 1-1 बळी मिळाला. कायरन पोलार्डच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने किताबाची लढाई जिंकली.

News Title- MI Emirates beat Dubai Capitals by 45 runs in ILT20 Final
महत्त्वाच्या बातम्या –

“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणेंसारख्या गुंडांपासून भास्कर जाधवांना सरंक्षण द्यावे”

“आज बाळासाहेब ठाकरे असते तर…”, शिंदेंकडून मोदींचे कौतुक, ठाकरेंवर घणाघात

एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी, पाहा मुख्यमंत्र्यांसोबत नेमका काय प्रसंग घडला

“पक्ष हातातून गेला!”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळ भडकले

वयाच्या चाळीशीतही दिसायचंय तरुण?, मग ‘हे’ फॉलो कराच…