‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’, अरबी लूकवरून सेहवाग टीकाकारांच्या निशाण्यावर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virender Sehwag | भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सेहवागला त्याच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाते. (Virender Sehwag Arab Avatar) क्रिकेटसह इतर क्षेत्रातील चालू घडामोडींवर तो सातत्याने भाष्य करत असतो. आता वीरू त्याच्या एका अनोख्या अवतारामुळे चर्चेत आला आहे. (Virender Sehwag in Arab avatar for the ILT20 Final) दुबईत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 लीगमध्ये समालोचन करताना सेहवागने तेथील पेहराव परिधान केला. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर आणि सेहवाग यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

खरं तर टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज वीरेंद्र सेहवाग मागील काही दिवसांपासून भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा जोरदार पुरस्कार करताना दिसत आहे. तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर अशाच गोष्टींची चर्चा करत असतो, मात्र शनिवारी त्याच्या एका लूकने सोशल मीडियावर एक नवीनच वाद निर्माण झाला. सेहवागचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अरबी लूकमध्ये दिसत आहे.

अरबी लूकवरून वीरूची खिल्ली

ILT20 फायनलसाठी वीरेंद्र सेहवाग दुबईला गेला आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर एमआय एमिरेट्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात त्याने समालोचन केले. यावेळी त्याच्यासोबत पाकिस्तानचा माजी स्टार गोलंदाज शोएब अख्तरही दिसला. दोन्ही खेळाडू अरेबियन लूकमध्ये दिसले. त्यांनी ‘जुब्बा’ घातला होता, जो इस्लामिक देशांमध्ये लोकप्रिय आहे. जो आयोजकांनी त्यांना सामना सुरू होण्यापूर्वी घालायला लावला होता.

 

वीरूच्या या लूकवरून त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ अशी त्याची परिस्थिती असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. कारण भारतीय संस्कृतीचे ज्ञान देणारा सेहवाग प्रथमच अरबी लूकमध्ये दिसला आहे. मागील काही काळापूर्वी सेहवागने टीम इंडियाऐवजी ‘टीम भारत’ यासाठी आग्रह धरला होता. यावरून तो प्रसिद्धीच्या झोतात आला मात्र आता त्याला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे.

Virender Sehwag ट्रोल

 

सोशल मीडियावर सेहवागच्या लूकवरून वाद सुरू झाला. एका युजरने लिहिले की, सेहवागला इंडियाचे नाव केवळ ‘भारत’ करायचे होते. आज तो अरबी पोशाख परिधान करतो आहे. तर एका युजरने म्हटले की, सेहवागचा ढोंगीपणा उघड झाला. वीरेंद्र सेहवाग भारतीयांना राष्ट्रवाद आणि देशभक्तीबद्दल व्याख्यान देतो आणि तो UAE मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरसोबत समालोचनाचा आनंद घेत आहे.

दरम्यान, वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर हे एकेकाळी क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय खेळाडू होते. मैदानावरील दोघांमधील वैर आणि बाहेरची मैत्री कोणापासून लपून राहिलेली नाही. मात्र, अनेक प्रसंगी ते एकमेकांना ट्रोल करतानाही दिसतात. अनेकदा दोघांनी एकमेकांची खिल्ली उडवली आहे.

News Title- Former Team India Player Virender Sehwag Appeared In Arab Avatar With Former Pakistan Player Shoaib Akhtar In ILT20 Final
महत्त्वाच्या बातम्या –