पोलीस भरतीसाठी सनी लिओनीचा अर्ज; अधिकारीही चक्रावले, ॲडमिट कार्ड व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sunny Leone | सोशल मीडियाच्या या जगात कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सध्या बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. (Sunny Leone Admit Card) उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेवरून अभिनेत्री सनी लिओनीचे नाव चर्चेत आले आहे. कन्नौजमधील पोलीस भरती परीक्षेचे प्रवेशपत्र व्हायरल होत आहे. या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो असून तिचे नावही लिहिले आहे. मात्र, परीक्षेच्या नियोजित तारखेला आणि वेळेत हे प्रवेशपत्र घेऊन पेपर देण्यासाठी कोणीही आले नाही.

प्रशासनाचा भोंगळ कारभार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला आहे. हा कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस कॉन्स्टेबल भरती परीक्षा घेतली जात आहे. शनिवार पहिला दिवस होता. परीक्षेपूर्वी कन्नौजच्या तिरवा येथील सोनश्री स्मारक बालिका महाविद्यालयातील प्रशासनाला पाठवलेल्या उमेदवारांच्या यादीत अभिनेत्री सनी लिओनीचे नाव पाहून धक्का बसला.

पोलीस भरती अन् भोंगळ कारभार

या यादीत केवळ नावच नाही तर चित्रपट अभिनेत्रीच्या फोटोचाही समावेश होता. स्वाक्षरीच्या जागी सनी लिओनीचा फोटोही लावण्यात आला होता. हा प्रकार पाहून अधिकारी आणि महाविद्यालय प्रशासनाला धक्का बसला. याची माहिती संबंधितांना देण्यात आली. यानंतर प्रशासनाने या प्रवेशपत्रासह पेपर देण्यासाठी कोण येते हे पाहण्याचा प्रयत्न केला.

खरं तर परीक्षा झाली पण हे प्रवेशपत्र घेऊन पेपर द्यायला कोणी आले नाही. यानंतर सनी लिओनीचा फोटो असलेले हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणीतरी सनी लिओनीच्या नावाने प्रँक म्हणून ऑनलाइन अर्ज केला होता. ही माहिती पोलीस भरती मंडळाला पाठवण्यात आली आहे.

Sunny Leone चे ॲडमिट कार्ड Viral

उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील तिरवा शहर परिसरात असलेल्या सोन श्री स्मारक बालिका महाविद्यालयात पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा घेण्यात आली. याच परीक्षा केंद्रावर महोबा येथील उमेदवार अंकितच्या ॲडमिट कार्डमध्ये सनी लिओनीचे छायाचित्र छापण्यात आले होते. सनी लिओनीचा फोटो दिसताच अधिकारी देखील अवाक् झाले.

दरम्यान, जनसेवा केंद्रातून हा फॉर्म भरण्यात आला. प्रवेशपत्रावर दिलेल्या फोन नंबरची माहिती घेतली असता, विद्यार्थी अंकित याने जनसेवा केंद्रातून पोलीस भरती परीक्षेसाठी फॉर्म भरल्याचे सांगितले. फोटो कसा बदलला याबद्दल त्याला काहीच माहिती नाही. या फोटोमुळे अंकित परीक्षेला बसू शकला नाही. विशेष बाब म्हणजे प्रवेशपत्रातील पत्ता मुंबईचा आहे.

News Title- Actress Sunny Leone Admit Card seen in Uttar Pradesh Police Recruitment Exam
महत्त्वाच्या बातम्या –

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’, अरबी लूकवरून सेहवाग टीकाकारांच्या निशाण्यावर

IPL 2024 पूर्वी ‘मुंबई’चा जलवा! पोलार्डच्या नेतृत्वात जिंकला ILT20 चा किताब, दुबई चीतपट

“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणेंसारख्या गुंडांपासून भास्कर जाधवांना सरंक्षण द्यावे”

“आज बाळासाहेब ठाकरे असते तर…”, शिंदेंकडून मोदींचे कौतुक, ठाकरेंवर घणाघात

एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी, पाहा मुख्यमंत्र्यांसोबत नेमका काय प्रसंग घडला