क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

South Africa | दक्षिण आफ्रिकेच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक माईक प्रॉक्टर यांचं निधन झालं आहे. प्रॉक्टर यांनी दक्षिण आफ्रिकेकडून 3 वर्षे क्रिकेट खेळले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते आयसीसी मॅच रेफरी बनले. पंच म्हणून त्यांचा कार्यकाळ बराच वादग्रस्त होता. अष्टपैलू माईक प्रॉक्टर यांनी आपल्या खेळीने क्रिकेट विश्वाला प्रभावित केले होते. दक्षिण आफ्रिकेच्या या महान क्रिकेटपटूचे 17 फेब्रुवारी 2024 रोजी डर्बन येथील रुग्णालयात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.

खरं तर माईक प्रॉक्टर यांना हृदयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान काही समस्या आल्या, त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रॉक्टर यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. माईक प्रॉक्टर यांची गणना दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते. त्यांनी 1967 ते 1970 दरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी 7 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 226 धावा केल्या, याशिवाय 41 बळी घेतले.

प्रॉक्टर यांचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू

माईक प्रॉक्टर संघाचा भाग असताना दक्षिण आफ्रिकेने 3 वर्षात खेळलेल्या 7 कसोटींपैकी एकाही कसोटीत दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला नाही. दक्षिण आफ्रिकेने 7 पैकी 6 कसोटी जिंकल्या. तर एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. माईक प्रॉक्टर यांची सर्वोत्तम गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेसाठीच्या त्यांच्या शेवटच्या कसोटीत दिसून आली.

आपल्या कसोटी कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात प्रॉक्टर यांनी मॅचविनिंग खेळी केली होती. त्यांनी पोर्ट एलिझाबेथमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 73 धावांत 6 बळी घेतले आणि त्याच्या संघाने 323 धावांनी विजय मिळवला.

South Africa । दिग्गज काळाच्या पडद्याआड

माईक प्रॉक्टर यांच्या पत्नी या एक प्रसिद्ध टेनिस स्टार राहिल्या आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या ‘न्यूज 24 वेबसाइट’ला आपल्या पतीच्या मृत्यूशी संबंधित माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हृदयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान काही समस्या जाणवल्या ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. एकदा प्रॉक्टर बेशुद्ध झाले पण ते पुन्हा शुद्धीवर आले नाहीत.

माईक प्रॉक्टर हे 2002 ते 2008 या काळात ICC चे मॅच रेफरी देखील होते. पंच म्हणून त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. त्यांच्या कार्यकाळात निर्माण झालेला सर्वात मोठा वाद 2006 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या ओव्हल कसोटीत पाहायला मिळाला. या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला, त्यानंतर त्यांनी सामना थांबवला. पाकिस्तानने देखील आक्रमक पवित्रा घेत सामना खेळण्यास नकार दिला होता. 2008 मध्ये हरभजन सिंगवर बंदी घालणारे रेफरी देखील माईक प्रॉक्टर होते.

News Title- Legendary South African all-rounder Mike Procter dies, aged 77
महत्त्वाच्या बातम्या –

पोलीस भरतीसाठी सनी लिओनीचा अर्ज; अधिकारीही चक्रावले, ॲडमिट कार्ड व्हायरल

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’, अरबी लूकवरून सेहवाग टीकाकारांच्या निशाण्यावर

IPL 2024 पूर्वी ‘मुंबई’चा जलवा! पोलार्डच्या नेतृत्वात जिंकला ILT20 चा किताब, दुबई चीतपट

“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणेंसारख्या गुंडांपासून भास्कर जाधवांना सरंक्षण द्यावे”

“आज बाळासाहेब ठाकरे असते तर…”, शिंदेंकडून मोदींचे कौतुक, ठाकरेंवर घणाघात