आमदार रोहित पवारांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar | गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये इनकमिंग सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नंबर लागला. त्यानंतर शिवसेना पक्षाचं जे झालं तेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालेलं पाहायला मिळालं आहे. भाजप फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी यशस्वी झालं असल्याचा दावा विरोधक करत आहेत. अनेकदा सीबीआय आणि ईडीचा वापर करत विरोधकांना आपल्याकडं वळवून घेण्याचं काम भाजप करतंय. अशातच अजित पवार भाजपमध्ये जाण्यामागचं कारण आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितलं आहे.

बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार हे बारामतीमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच विधानसभा अध्य़क्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांनी बारामती येथे अजित पवार यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला.

आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ येऊ लागली आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवार आपल्या बहिणीविरोधात आपला उमेदवार उभा करणार आहे. सुप्रिया सुळे आपला बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यासाठी ऑक्टिव्ह झाल्या आहेत. तर दूसरीकडे अजित पवार यांच्याबाबत पुतण्या आणि शरद पवार गटातील आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आळंदी येथे अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

काय म्हणाले रोहित पवार? 

आळंदी येथे बोलत असताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर थेट आरोप करत स्वत:बाबत एक गौप्यस्फोट केला ते म्हणाले की, “अजित पवार हे जेलला घाबरून भाजपसोबत गेले आहेत. इतरही जेलला घाबरूनच गेले आहेत. भाजपसोबत जाण्यासाठी मलाही ऑफर असतील ना?”, असा सवाल करत स्वत:ला भाजपमधून कॉल आल्याचं सांगितलं. “84 वर्षांचे शरद पवार लढत आहेत. त्यांना सोडून आपण पळून गेलं तर कसं चालेल. आम्ही जेलला घाबरत नाही. कारण तसं काही चुकीचं केलंच नाही,” असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहे.

“आंबेगावमध्ये सभा होणार आहे. त्यासभेमध्ये मला बोलायची संधी दिली तर मी बोलेल. तेव्हा तुम्हाला सभेमध्ये जाऊ नका असं सांगण्यात येईल. फोन येईल, ऊस घेतला जाणार नाही, कर्ज दिलं जाणार नाही, धमकी दिली जाईल त्यामुळे सावध राहा”, असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

“बाळासाहेबांची शिवसेना भाजपने फोडली”

“बारामतीत उमेदवार कोणता देतात ते पाहू? उमेदवार जवळचा असला तरीही आपली लढायची तयारी आहे. येत्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांच्या बाजूने सत्ता निकाल लागलेला दिसेल. ही लढाई भाजपला सोपी झाली तर भाजप महाराष्ट्राचे अस्तित्व ठेवणार नाही. मराठी अस्मिता बाळासाहेबांनी ठेवली आणि तिच शिवसेना भाजपने फोडली”, असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

News Title – Rohit pawar Aggressive On Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी, पाहा मुख्यमंत्र्यांसोबत नेमका काय प्रसंग घडला

“पक्ष हातातून गेला!”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळ भडकले

वयाच्या चाळीशीतही दिसायचंय तरुण?, मग ‘हे’ फॉलो कराच…

पाण्याच्या बिझनेसमधून करा लाखोंची कमाई, जाणून घ्या सर्व माहिती एकाच ठिकाणी

अजित पवार म्हणाले मला कुटुंबानं एकटं पाडलं…. अखेर शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं!