आनंद महिद्रांनी जिंकली मनं! सर्फराज खानच्या वडिलांना देणार लाखो रूपयांचं गिफ्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Anand Mahindra | सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात भारताला 445 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला तिसऱ्या दिवशी काही खास करता आले नाही. मोहम्मद सिराजने चार बळी घेऊन पाहुण्या संघाला चीतपट केले. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 322 धावांची मजबूत आघाडी घेतली. या सामन्यातून मुंबईकर सर्फराज खानने भारतीय संघात पदार्पण केले आहे.

पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच डावात सर्फराजने अर्धशतकी खेळी केली. सर्फराजने पदार्पणाच्या सामन्यात 66 चेंडूत 62 धावा केल्या, मात्र रवींद्र जडेजाच्या एका चुकीमुळे तो धावबाद झाला. सर्फराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने भरपूर धावा करून भारतीय संघाचे तिकिट मिळवले. 26 व्या वर्षी सर्फराजने भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न साकार केले.

नौशाद खान यांना ‘थार’ देणार

सर्फराजचा संघर्ष आणि त्याची मेहनत त्याला इथपर्यंत घेऊन आली. सर्फराजच्या यशात त्याचे वडील नौशाद खान यांचाही मोठा हात आहे. खरं तर सर्फराजला पदार्पणाची कॅप मिळाली तेव्हा नौशाद खान यांना आनंदाश्रू आले. पहिल्याच डावात स्फोटक खेळी करणाऱ्या सर्फराजच्या फलंदाजीचे खूप चाहते आहेत आणि त्याने प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील आपलेसे केले आहे.

Anand Mahindra यांनी जिंकली मनं

सर्फराजचा संघर्ष आणि त्याच्या वडिलांनी दिलेली साथ हे पाहून महिंद्रा यांनी नौशाद खान यांना एक थार गाडी भेट देणार असल्याचे सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, कधीच हार मानू नका… कठीण परिश्रम, संयम आणि मुलांना प्रेरणा देण्यासाठी वडिलांमध्ये यापेक्षा चांगला गुण कोणता असू शकतो? एक प्रेरणादायी पालक असल्याने नौशाद खान यांनी थारची भेट स्वीकारली तर ती माझ्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची बाब असेल. आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथा दिवस आहे.

 

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ –

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, जेम्स अँडरसन, रेहान अहमद, मार्क वुड.

News Title- ind vs eng 3rd test Renowned industrialist Anand Mahindra said that Sarfaraz Khan’s father Naushad Khan will be gifted a Thar

महत्त्वाच्या बातम्या –

आमदार रोहित पवारांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

हरभजन सिंगवर बंदी घालणाऱ्या दिग्गजाचे निधन, शस्त्रक्रियेनंतर मृत्यू; क्रिकेट विश्वावर शोककळा

पोलीस भरतीसाठी सनी लिओनीचा अर्ज; अधिकारीही चक्रावले, ॲडमिट कार्ड व्हायरल

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’, अरबी लूकवरून सेहवाग टीकाकारांच्या निशाण्यावर

IPL 2024 पूर्वी ‘मुंबई’चा जलवा! पोलार्डच्या नेतृत्वात जिंकला ILT20 चा किताब, दुबई चीतपट