टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | टीम इंडिया (Team India) विरुद्ध इंग्लंड यांच्यात राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. अशात टीम इंडियाच्या (Team India) गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. आर अश्विन चौथ्या दिवशी टीम इंडियात (Team India) परतणार असल्याची माहिती बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अश्विन तिसऱ्या सामन्याचा दुसरा दिवस संपल्यानंतर चेन्नईला गेला होता.

टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज

बीसीसीआयने ट्विट केले की, आर अश्विन चौथ्या दिवशी पुनरागमन करेल आणि सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात संघासाठी योगदान देत राहील. अश्विन रजेवर असल्याने तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला नाही. रविचंद्रन अश्विनने शुक्रवारी राजकोट कसोटीत कसोटी क्रिकेटमधील 500 बळी पूर्ण केले. हा टप्पा गाठणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आधी अनिल कुंबळेने 105 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने 322 धावांची आघाडी घेतली आहे. राजकोटमध्ये शनिवारी 207/2 धावसंख्येने दिवसाची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 319 धावांत सर्वबाद झाला.

विराट कोहली ब्रेकवर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली कौटुंबिक कारणांमुळे ब्रेकवर आहे. सध्या तो परदेशात असल्याचं समजतंय. दुसऱ्या कसोटीनंतर त्याच्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले होते की, मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी कोहलीची उपलब्धता जाणून घेण्यासाठी संघ व्यवस्थापन त्याच्याशी संपर्क साधेल. कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे विराटला आतापर्यंत कसोटी मालिकेतील एकही सामना खेळता आलेला नाही.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…म्हणून मी शिवसेना सोडली?’; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

आनंद महिद्रांनी जिंकली मनं! सर्फराज खानच्या वडिलांना देणार लाखो रूपयांचं गिफ्ट

आमदार रोहित पवारांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

हरभजन सिंगवर बंदी घालणाऱ्या दिग्गजाचे निधन, शस्त्रक्रियेनंतर मृत्यू; क्रिकेट विश्वावर शोककळा

पोलीस भरतीसाठी सनी लिओनीचा अर्ज; अधिकारीही चक्रावले, ॲडमिट कार्ड व्हायरल