Onion Export | गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export) घातली होती. यावर विरोधकांनी सरकारच्या नावाने शिमगा घातला होता. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी कधी उठवली जाईल? असे विरोधक कायम केंद्र सरकारला प्रश्न करत होते. ही बंदी मार्चमध्ये उठवली जाईल, असं केंद्र सरकारने सांगितलं. मात्र त्याआधीच ही बंदी उठवली असल्याची माहिती आता समोर आली आहे.
कांद्याच्या निर्यातीवर बंदी
कांद्याच्या किंमतीमध्ये वाढ होत होती. यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास भोगावा लागत होता. म्हणून गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. 24 मार्च 2024 रोजी बंदी हटवण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं होतं. मात्र आता त्याआधीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर (Onion Export) बंदी हटवली आहे.
मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक घेण्यात आली होती. याबैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील कांद्याचा साठा पाहिल्यास निर्यातीला (Onion Export) परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.
तीन लाख मेट्रीक टन कांदा निर्यातीला मंजूरी
याआधीदेखील केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या बंदीवर निर्णय घेतला होता. मात्र कांद्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याने हा निर्णय घेतला. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने तीन लाख मेट्रीक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली होती. तसेच बांगलादेशमध्ये 50 हजार टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे.
कांद्याचे कमी उत्पन्न आणि भरमसाट किंमतीत झालेली वाढ यामुळे केंद्रसरकारने 8 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आणि 100 रूपये विकला जाणारा कांदा आता त्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे.
कांद्याच्या निर्यातीवरील बंदीवर विरोधक सतत टीका करत होते. कांदा एक नाशवंत पिक असल्याने त्यावर निर्यातबंदी घालण्यात आली होती. यामुळे किंमतीत घट झाली आणि शेतकऱ्यांना याचा फयदा झाला नाही. यामुळे विरोधक केंद्र सरकारवर कांद्याच्या निर्यातीवरील बंदीबाबत मागणी केली.
News Title – Onion Export ban left news update
महत्त्वाच्या बातम्या
‘नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे, त्यामुळे…’; अजित पवारांचं मोठं क्तव्य
‘या’ लोकांना हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका, बातमी वाचून झोप उडेल
सॅमसंगची सर्वात मोठी घोषणा; ‘हा’ जबरदस्त फोन झाला स्वस्त
पुणेकरांनो सावधान! ‘या’ दिवशी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट समोर
यशस्वीचा डबल धमाका; इंग्लंडविरूद्ध द्विशतकी खेळी करत गोलंदाजांना पाजलं पाणी