पुणेकरांनो सावधान! ‘या’ दिवशी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | महाराष्ट्राच्या काही भागात उन्हाळा सुरु झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. तर काही ठिकाणी हवामानात बदल झाल्यामुळे राज्यात वातावरण ढगाळ झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यात देखील गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. मात्र पुण्यात मेघगर्जनेसह पावासाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

पुण्यात पावसाची शक्यता?

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा जाणवत आहे. पुण्यात दिवसा उष्ण तर रात्री गार वारा आहे. मात्र काही वेळा शहरात ढगाळ वातावरण देखील दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आयएमडी पुण्याच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डाॅ. अनुपम कश्यपी यांनी याबदल माहिती दिली आहे. कश्यपी म्हणाले की, ‘आज रात्रीपासून (18 फेब्रुवारी) सक्रिय वारे उत्तर-पश्चिम भारतात धडकण्याची शक्यता आहे.

त्याच्या प्रभावामुळे 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात मेघगर्जनेसह हलका/मध्यम पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही भाग सोडला तर पुण्यात पावसाची शक्यता नाही. 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

कुठे कुठे हवामान कोरडे राहणार?

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पुढील काही दिवस उष्णता जाणवणार आहे. राज्यात पावसाची शक्यता आहे पण पुण्यात मात्र उका़डा जाणवणार आहे.

थंडीचा ओघ संपत नाही तोच राज्यात काही भागात वरुण राजाने हजेरी लावली. फेब्रुवारी महिना हा तसा उन्हाळ्याची चाहूल देणारा असतो. मात्र या महिन्यात पावसासह (Weather Update) गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान विभागाने याचा अंदाज वर्तवला होताच.

विदर्भात पुन्हा पाऊस?

हवामान विभागाच्या (Weather Update) अंदाजानुसार, विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहील.

News Title : weather update rain to fall in pune

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर!

चॉकलेटच्या किंमतीत मिळणाऱ्या शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज!

‘…म्हणून मी शिवसेना सोडली?’; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

आनंद महिद्रांनी जिंकली मनं! सर्फराज खानच्या वडिलांना देणार लाखो रूपयांचं गिफ्ट