यशस्वीचा डबल धमाका; इंग्लंडविरूद्ध द्विशतकी खेळी करत गोलंदाजांना पाजलं पाणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

India Vs Eng Test | सध्या राजकोट येथे इंग्लंड विरूद्ध टीम इंडिया (India Vs Eng Test) असा तिसरा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा यंग क्रिकेटर यशस्वी जयस्वालने धुवादार खेळी करत याच सिरीजमध्ये दुहेरी शतक केलं आहे. मागील सामना यशस्वीचा पहिला कसोटी सामना होता तर आता हा यशस्वीचा दुसरा सामना आहे. या सामन्यात यशस्वीने शतकी खेळी साकारली असल्याने नावाप्रमाणे यशस्वी आपली भूमिका वठवताना दिसत आहे.

टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड (India Vs Eng Test) या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये राजकोटच्या निरंजन शहा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी आजचा चौथा दिवस आहे. सामना हा रोमांचक स्थितीत पोहोचला असून टीम इंडियाने पहिल्या डावामध्ये 445 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा पहिला डाव हा 319 धावांवर आटोपला आहे. सध्या भारताचा दुसरा डाव सुरू आहे.

यशस्वी जयस्वालची द्विशतकी धावांची मजल

टीम इंडियाच्या डावामध्ये सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने द्विशतक ठोकलं आहे. 232 चेंडूमध्ये जयस्वालने द्विशतक ठोकलं आहे. इंग्लंडविरोधात दुसऱ्या मालिकेमध्ये द्विशतक ठोकलं आहे. यामुळे यशस्वीवर अनेक विक्रम नावावर करण्यात आले आहेत. टीम इंडियाने 4 बाद 430 धावा करून दुसरा डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य देण्यात आलं आहे. (India Vs Eng Test)

यशस्वीने धमाकेदार खेळी करत द्विशतक करत असताना 11 षटकार आणि 14 चौकार लगावले आहेत. कसोटीमध्ये एका षटकात तीन षटकार लगावणारा टीम इंडियाचा तो पाचवा फलंजाद ठरला आहे. रोहित शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्याने हा पराक्रम केला आहे.


कसोटीतील एका डावामध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज हा यशस्वी जयस्वाल आहे. पाकिस्तानचे दिग्गज माजी खेळाडू वसिम अक्रमच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे.  वसिम अक्रमने हा विक्रम 1996 साली केला होता.

सरफराजचा डबल धमाका

दरम्यान यशस्वी जयस्वालनंतर आता सरफराज खानचे देखील देशभरामध्ये कौतुक होताना दिसत आहे. यशस्वीने कसोटीमध्ये पदार्पणामध्ये द्विशतक केलं. त्याचप्रमाणे सरफराज खान या पदार्पण केलेल्या फलंदाजाने कसोटी सामन्यात दोनदा अर्धशतकी खेळी केली आहे.

News Title – India Vs Eng Test In Yashasvi Jayswal double century

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर!

चॉकलेटच्या किंमतीत मिळणाऱ्या शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज!

‘…म्हणून मी शिवसेना सोडली?’; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

आनंद महिद्रांनी जिंकली मनं! सर्फराज खानच्या वडिलांना देणार लाखो रूपयांचं गिफ्ट