“उगवत्या सूर्याला नमस्कार करत असताना मावळत्या चंद्राला…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule Vs Sunetra Pawar | निवडणूक आयोगाने अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे बारामतीतील काही मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे तर काही मतदारांनी अजित पवार यांच्या बाजूने आपलं मत मांडत भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांनी आपल्या काकांसोबत राजकीय पंगा घेतल्यानं त्यांना जड जाणार असल्याचं बोललं जात आहे तर अजित पवार यांचं बारामतीमध्ये चांगलं काम असल्याचं देखील बोललं जात आहे. (Supriya Sule Vs Sunetra Pawar)   

दोन दिवसाआधी अजित पवार हे बारामतीमध्ये आले असताना त्यांनी कुटुंबाने मला एकटं टाकलं असल्याचा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल शरद पवार हे बारामती येथे आले होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. 

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसा लोकांच्या मनामध्ये संभ्रम होत असल्याचं पाहायला मिळतोय. यावर काही माध्यमांनी बारामतीमध्ये जात बारामतीकरांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. यावर बारामतीकरांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणाला अजित पवार यांना मुख्यमंत्री पाहायचं आहे. तर कोणाला खासदार म्हणून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना पाहायचं आहे. तर कहींनी नो कॉमेंट्स करत चिडीचूप झाले आहेत.

सुनेत्रा पवार खासदारकीच्या उमेदवार? 

गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा रथ फिरत असल्याचं पाहिलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) लढणार असल्याचे संकेत असून यावेळी बारामती मतदारसंघामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळेल.

बारामतीकर काय म्हणाले? 

माध्यमांनी बारामतीमध्ये जात बारामतीकरांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. यंदा सुप्रिया सुळे की अजित दादांचा उमेदवार निवडूण येईल?, (Supriya Sule Vs Sunetra Pawar) असा माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर बारामतीकरांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहीजण सुप्रिया सुळे यांच्याबाजून अधिक मत मिळतील असं काहींनी आपलं मत सांगितलं आहे. तर काहींनी यावर काही बोलायचं नसल्याचं सांगितलं. तसेच काहींनी यंग जनरेशन ही अजितदादांच्या बाजूने आहे. त्यांना यंदा मुख्यमंत्री बनवणार असल्याचं मत बारामतीतील तरूणांनी सांगितलं आहे.

काहीजणांनी उगवत्या सूर्याला नमस्कार करत असताना मावळत्या चंद्राला विसरू नये, अशी प्रतिक्रिया बारामतीकरांनी दिली आहे. तर कहींनी दोन्हीही आपलेच असल्याचं सांगितलं आहे. विधानसभेला दाद आणि खासदाकीला सुप्रिया सुळे अशा काही प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिल्या आहेत.

News Title – Supriya Sule Vs Sunetra Pawar news

महत्त्वाच्या बातम्या- 

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर!

चॉकलेटच्या किंमतीत मिळणाऱ्या शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज!

‘…म्हणून मी शिवसेना सोडली?’; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

आनंद महिद्रांनी जिंकली मनं! सर्फराज खानच्या वडिलांना देणार लाखो रूपयांचं गिफ्ट