‘…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला’; चाहत्यांनी घेतली फिरकी

Sana Javed | पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीगचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या धर्तीवर शेजारील देशात ही लीग खेळवली जाते. शनिवारपासून पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामाला सुरूवात झाली आहे. सलामीचा सामना लाहोर कलंदर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात खेळवला गेला. पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा विद्यमान कर्णधार शाहीन आफ्रिदी लाहोरच्या संघाचे नेतृत्व करत आहे, त्याच्याच नेतृत्वात या संघाने मागील दोन वर्ष किताब जिंकला.

एकूण सहा संघ या लीगमध्ये खेळत आहेत. रविवारी मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर कराची किंग्ज आणि मुल्तान सुल्तान यांच्यात सामना झाला. कराची किंग्जच्या संघाचा शोएब मलिक हिस्सा आहे. मागील काही दिवसांपासून मलिक त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन सना जावेदशी लग्न केले.

…अन् चाहत्यांनी घेतली फिरकी

सना जावेद ही पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे हे दुसरे लग्न असून आपल्या पतीला चीअर करण्यासाठी ती पाकिस्तान सुपर लीगमध्ये दिसली. सनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवरून चाहते तिची आणि शोएब मलिकची फिरकी घेत आहेत. शोएबने कराची किंग्जकडून खेळताना 35 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या.

 

शोएब मलिक कराची किंग्जच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पीएसएलच्या नवव्या हंगामातील आपल्या सलामीच्या सामन्यात त्याने उत्कृष्ट खेळी केली. पत्नी सना जावेद उपस्थित असल्यामुळेच त्याला मोठी खेळी करता आली, अशा मिश्किल प्रतिक्रिया चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत. अलीकडेच हे कपल पाकिस्तानातील मुल्तान विमानतळावर स्पॉट झाले होते.

 

Sana Javed PSL मध्ये स्पॉट

शोएब मलिकने सानिया मिर्झाशी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सानिया आणि शोएब यांचे 2010 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. खरं तर सानिया आणि शोएब यांचा मुलगा सध्या सानियासोबतच आहे. सानियाने घटस्फोटानंतर अद्याप एकदाही उघडपणे भाष्य केले नाही. ती केवळ सोशल मीडियावर सक्रिय असते.

पाकिस्तानातील अभिनेत्री सना जावेद दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. शोएल मलिक आधी सनाने पाकिस्तानातील गायक आमिर जेसवालसोबत लग्न केले होते. त्यामुळे शोएब तिसऱ्यांदा आणि सना दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली.

News Title- Sana Javed was seen cheering her husband Shoaib Malik at the Pakistan Super League
महत्त्वाच्या बातम्या –

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…

अखेर विराट कोहलीच्या अनुपस्थितीचं कारण आलं समोर; ‘विरुष्का’बद्दल मोठी अपडेट

दीपिका पादुकोणने पुन्हा वाढवली भारताची शान; लंडनमधील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गाजवला

पुरुषांमध्ये ‘हे’ 3 गुण असतील तर महिला होतात आकर्षित, चाणक्यांनी ठेवलंय लिहून

मोठी बातमी! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय