शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, गावाचे छावणीत रूपांतर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivaji Maharaj | आज 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती साजरी केली जाते. आजच्या दिवशी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण, दक्षिण गोव्यातील एका गावात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पुतळ्याला लोकांचा विरोध पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

ज्या गावात महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे, तेथील नागरिकांनी पुतळा बसवण्यास विरोध केला. तणाव वाढल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. सध्या गावात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दक्षिण गोव्यातील साओ जोस दे अरेल गावात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद झाला.

पुतळा बसवण्यावरून वाद

खरं तर इथे ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता पुतळा बसवण्यात आला आहे. ग्रामस्थांची नाराजी पाहता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यासाठी स्थानिक लोक मोठ्या संख्येने शिवाजी महाराजांचा जयघोष करत आले असता गावातील काही लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

गावकऱ्यांचा विरोध वाढल्याने दोन्ही गट आमनेसामने आले. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जात आहे, त्या गावात मराठी किंवा हिंदू समाज नाही. इथे बहुसंख्य ख्रिश्चन लोकसंख्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुतळा बसवण्यास गावातील लोकांचा विरोध होता, मात्र पुतळ्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरही शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे.

Shivaji Maharaj यांची जयंती

दरम्यान, लोकांचा विरोध पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षिण गोव्याच्या एसपींनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पुतळा बसवण्यात आला असला तरी खबरदारी म्हणून पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. आताच्या घडीला या गावात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त महाराजांच्या विविध गडावरून ज्योत पेटवून आणत असतात.

News Title- was a controversy over the installation of a statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Goa
महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला; पतीला चीअर करताना सना, चाहत्यांनी घेतली फिरकी

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…

अखेर विराट कोहलीच्या अनुपस्थितीचं कारण आलं समोर; ‘विरुष्का’बद्दल मोठी अपडेट

दीपिका पादुकोणने पुन्हा वाढवली भारताची शान; लंडनमधील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गाजवला

पुरुषांमध्ये ‘हे’ 3 गुण असतील तर महिला होतात आकर्षित, चाणक्यांनी ठेवलंय लिहून