शरद पवारांना बसणार आणखी एक मोठा धक्का!

Sharad Pawar

मुंबई | भाजप शरद पवार (Sharad Pawar) यांना आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपl प्रवेश केलाय. यामुळे आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमध्ये अनेक मोठे नेते गेल्या काही काळात आले आहेत. आता भाजपने राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाला आणखी मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.

पवारांना बसणार आणखी एक मोठा धक्का

शरद पवार यांचा निकटवर्तीय असलेला आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या नेत्याच्या भाजप प्रवेशाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठं खिंडार पडेल. आता हा मोठा नेता कोण आणि तो खरचं शरदप पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये जातो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sharad Pawar | काँग्रेसलाही मोठं खिंडार

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक मोठे नेते, माजी आमदार पक्षांतर करताना दिसत आहेत. महाविकास आघआडीतील पक्षांमध्ये मोठी गळती सुरू असून काही दिवसांपूर्वी काँग्रेसला लागोपाठ मोठे धक्के बसले.

आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांसारखे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी एकामागोमाग एक पक्षाला रामराम ठोकला.

महत्त्वाच्या बातम्या- 

अमिताभ बच्चन यांचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाले, “15 तास स्वतःला खोलीमध्ये..”

आयपीएल सुरू होण्याआधीच CSK ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू गंभीर जखमी

अभिनेता वरुण धवनने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज!

‘या’ विद्यार्थींनींना मिळणार मोफत शिक्षण, अजित पवारांनी केली मोठी घोषणा

शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, आत्ताच जाणून घ्या…

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .