अमिताभ बच्चन यांचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाले, “15 तास स्वतःला खोलीमध्ये..”

Amitabh Bachchan | ‘बिग-बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. 1980 च्या दशकामध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. शोले. डॉन, दीवार, शराबी, मर्द, सिलसिला यासारख्या अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. अजूनही ते चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत.

आता त्यांनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘दीवार’ या चित्रपटाच्या शूटदरम्यानचा एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे. तेव्हा स्वतःला 15 तास खोलीमध्ये बंद केल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.

अमिताभ बच्चन यांचा खुलासा

‘दीवार’मध्ये एक सीन होता, ज्यामध्ये त्यांना पहिल्यांदाच मंदिरात जाऊन आपल्या आईसाठी प्रार्थना करायची होती. ते म्हणाले की, हा सीन माझ्यासाठी खूप कठीण होता. मी माझा मेकअप आणि गेटअप घेऊन सकाळी लवकर तयार झालो, पण सेटवर गेलोच नाही.

तेव्हा यश चोप्रा सीन रेडी आहे हे सांगायला त्यांच्याजवळ गेले, पण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)काही खोलीमधून बाहेर आलेच नाहीत. आम्ही सकाळी 7 वाजता शूट सुरू केले होते. मात्र, मी रात्री 10 वाजेपर्यंत खोलीमधून बाहेर पडलोच नाही. मी स्वतःला साधारण 15 तास खोलीत बंद केले होते, असा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

हा किस्सा सांगताना अमिताभ बच्चन पुढे म्हणाले की, मी खोलीच्या बाहेर आलोच नाही. मी फक्त विचार करत होतो की हा सीन कसा होईल. याचा विचार करण्यात मी बराच वेळ घेतला आणि स्वतःला त्या खोलीत कोंडून घेतले. या सीनमध्ये विजय देवावर विश्वास ठेवत नाही, तरीही तो आपल्या आईसाठी देवाच्या दारात जातो. ही स्क्रिप्ट लिहिणाऱ्या लेखकाला मी सलाम करेन.

डायलॉगमुळे हीट झाला होता ‘दीवार’ चित्रपट

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा हाच ‘दीवार’ चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला होता. यातील डायलॉग प्रचंड हीट झाले होते. ‘मेरे पास मां है’, ‘मेरा बाप चोर है’, ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’,’आज खुश तो बहुत होगे तुम’ हे डायलॉग तेव्हा प्रचंड गाजले होते. त्याकाळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 7.5 कोटींचा गल्ला कमवला होता. आजही यातील डायलॉग प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

News Title-  Amitabh Bachchan shared a memory during the shoot of the film Deewar

महत्त्वाच्या बातम्या –

OUT अन् 20 मिनिटांनी NOT OUT; रहाणेसोबत काय घडलं? प्रथमच झालं असं, कोचनं मागितली माफी

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, गावाचे छावणीत रूपांतर

…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला; पतीला चीअर करताना सना, चाहत्यांनी घेतली फिरकी

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…

अखेर विराट कोहलीच्या अनुपस्थितीचं कारण आलं समोर; ‘विरुष्का’बद्दल मोठी अपडेट