रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ranbir Kapoor | अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाच्या अजूनही चर्चा होतात. रणबीरच्या (Ranbir Kapoor) भूमिकेने सर्वांचीच मने जिंकली. तर दुसरीकडे अभिनेत्री ऐश्वर्या रायही ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. जया बच्चन यांनीही बऱ्याचदा ऐश्वर्याबद्दल खुलासे केले आहेत. लवकरच ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळं होणार असल्याचंही म्हटलं गेलं. अशातच आता रणबीर कपूरने ऐश्वर्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

रणबीर कपूरचा ऐश्वर्याबद्दल धक्कादायक खुलासा

रणबीर आणि ऐश्वर्या यांनी ‘ ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यात अनुष्का शर्मादेखील मुख्य भुमिकेत होती. यात ऐश्वर्याने रणबीरसोबत इंटीमेंट सीन्सही दिले होते. यावर बच्चन कुटुंबाने नाराजीही जाहीर केली होती. आता रणबीरने (Ranbir Kapoor) तिच्यासोबत केलेल्या कामाचा अनुभव शेअर केला आहे.

रणबीरने एका मुलाखतमध्ये ऐश्वर्याबद्दल धक्कादायक विधान केलं होतं. हा व्हिडीओ तसा जुना आहे. पण, आता तो चांगलाच व्हायरल होत आहे. “कोणाला आवडणार नाही ऐश्वर्या रायसोबत रोमांन्स करायला? माझ्या करिअरमधील तो मोठा क्षण होता. करणने मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटामुळे माझ्यात आणि ऐश्वर्यात एक चांगले रिलेशन तयार झाले.”, असं रणबीर या मुलाखतीमध्ये म्हणाला होता.

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा

‘मला अगोदर वाटलंच नाही की, ती माझ्यासोबत काम करायला होकार देईल.पण ती हो म्हणाली.’,असंही रणबीर म्हणाला. ऐ दिल है मुश्किल चित्रपटात ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा रोमांन्स बघायला मिळाला. चाहत्यांना त्यांची जोडी प्रचंड आवडली होती. रणबीरचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

घटस्फोटाच्या चर्चा असताना ऐश्वर्याने अभिषेक बच्चनला त्याच्या वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा दिल्या होत्या. “तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला खूप आनंद, प्रेम, शांती आणि उत्तम आरोग्य लाभो. खूप सारे प्रेम.”, अशी पोस्ट करत अभिषेकचा बालपणीचा एक फोटोती तिने पोस्ट केला होता. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात नेमकं चाललंय तरी काय, याबाबत चाहते बुचकळ्यातच पडले आहेत.

News Title-  Ranbir Kapoor shocking revelation about Aishwarya Rai

महत्त्वाच्या बातम्या –

राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव उतरले?, जाणून घ्या आजचे दर

बाजारात नव्या बाईकची एंट्री; Kawasaki ची जबरदस्त बाईक लाँच, जाणून घ्या किंमत

शरद पवारांना बसणार आणखी एक मोठा धक्का!

आयेशा टाकियाने सोडलं मौन, ट्रॉलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली…

अमिताभ बच्चन यांचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाले, “15 तास स्वतःला खोलीमध्ये..”