बाजारात नव्या बाईकची एंट्री; Kawasaki ची जबरदस्त बाईक लाँच, जाणून घ्या किंमत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kawasaki Z650RS | मुलांना नेहमीच बाईक आणि गाड्यांबद्दल जाणून घ्यायला आवडतं. आपल्याकडेही खूप सारे फीचर्सवाली बाइक असावी अशी प्रत्येक मुलाची इच्छा असते. मात्र बऱ्याचदा किंमत पाहून ते स्वप्न आधुरं राहून जातं. आता कावासाकीने (Kawasaki Z650RS) अशाच एका बाइकला लाँच केलं आहे. ज्यात भरपूर फीचर्स पाहायला मिळतील. भरपूर फीचर्ससह त्याची किंमतही परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे.

Kawasaki India ने Z650RS चं अपडेटेड वर्जन भारतीय बाजारात लॉन्च केलं आहे. या रेट्रो स्टाइल बाईकची किंमत 6.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही एक मिडल वेट बाईक आहे जी आधुनिक आणि क्लासिक एलिमेंटला एकत्र जोडते.

Z650RS मध्ये 2-मोड ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आहे. ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम जोडल्याने मॉडेल अधिक सुरक्षित झाले आहे. यामुळे ओल्या रस्त्यावर दुचाकी घसरण्यापासून बचाव होतो. याशिवाय बाईकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतात सध्या Z650RS ची स्पर्धा बेनेली लियोनसिनो 500, होंडा CL500 स्क्रैम्बलर, ट्रायम्फ स्ट्रीट ट्विन आणि डुकाटी स्क्रैम्बलर 800 सारख्या बाइक्ससोबत आहे.

Kawasaki Z650RS ची डिझाईन

कावासाकी Z650RS ची रचना ट्यूबलर डायमंड फ्रेमवर केली आहे. यात गोल हेडलॅम्प, सिंगल-पीस सीट्स, सेमी-एनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहेत. हे भारतीय बाजारपेठेत फक्त सिंगल कलर मेटॅलिक मॅट कार्बन ग्रे मध्ये उपलब्ध आहे.

Kawasaki Z650RS चे फीचर्स

कावासाकी Z650RS मध्ये आरामदायी राइडिंगसाठी समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आहेत. जे 125mm पर्यंत प्रवास करू शकतात. तसेच मागील बाजूस एक मोनोशॉक एब्जॉर्बर आहे, जो 130 मिमी पर्यंत प्रवास करू शकतो. ब्रेकिंगसाठी समोर 272 मिमी ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 186 मिमी सिंगल डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. बाईक 17 इंच गोल्डन अलॉय व्हीलवर चालते.

Kawasaki Z650RS परफॉर्मन्स

या बाईकमध्ये 649 सीसी लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन आहे. जे 8000 RPM वर 67BHP चे कमाल पॉवर आउटपुट आणि 6700RPM वर 64Nm चे पीक टॉर्क आउटपुट जनरेट करते.

ट्रान्समिशनसाठी इंजिनला 6-स्पीड ऑन-ड्यूटी गिअरबॉक्स युनिटसह ट्यून केले आहे, जे असिस्ट आणि स्लिप क्लचसह येते. हा इंजिन सेटअप Ninja 650 आणि Versus 650 मध्ये देखील आढळतो.

News Title-  Kawasaki Z650RS New Bike Launch

महत्त्वाच्या बातम्या –

टाटा समूहाला ‘देव’ पावणार? वैष्णोदेवी ते अयोध्येपर्यंत कमाईची ‘भारी’ योजना

OUT अन् 20 मिनिटांनी NOT OUT; रहाणेसोबत काय घडलं? प्रथमच झालं असं, कोचनं मागितली माफी

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, गावाचे छावणीत रूपांतर

…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला; पतीला चीअर करताना सना, चाहत्यांनी घेतली फिरकी

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…