शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

ShivJayanti | महाराष्ट्राचे आरध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (ShivJayanti) यांची आज जयंती आहे. राज्य़भरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (ShivJayanti) शिवनेरी गडावर विशेष कार्यक्रम होत आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या आहेत. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारं राज्य आहे. तसेच राज्यामध्ये काही उपक्रम राबण्यात आले आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे.

मराठा आंदोलकांकडून घोषणा

एकनाथ शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. शिवनेरीवरून मराठा आंदोलकांकडून घोषणा देण्यात आल्या आहेत. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा मराठा आंदोलकांनी केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशनाविषयी त्यांनी माहिती दिली आहे. (ShivJayanti)

मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन

शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर मोठं विधान केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या (मंगळवार 20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ओबीसी तसेच इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.

दांडपट्टा राज्याचं राज्यशस्त्र

अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं शिंदे म्हणाले. त्यानंतर त्यांनी राज्याचं राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याला घोषित करण्यात आल्याचं सांगितलं आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार वाघ नख भारतात आणणार असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान आहे. यामुळे जयंती निमित्त अनेक शिवभक्त या स्थळी जात भेट देतील.

News Title – Shivjayanti on Eknath Shinde Talk About maratha reservation at shivneri Fort

महत्त्वाच्या बातम्या