मनसे-भाजप युतीबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या बंगल्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय खलबतं निर्माण होताना दिसत आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच आता भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेत पक्षाला बळकटी दिली आहे.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी भाजप मनसे युतीबाबत प्रश्न केला. यावर राज ठाकरेंनी उत्तर दिलं. (Raj Thackeray)

आपण एनडीएमध्ये जाणार का?

पत्रकारांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण एनडीएमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला होता. यावर राज ठाकरे उत्तर देत म्हणाले की, “आजचा विषय वेगळा आहे. एका वेगळ्या कारणासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. जेव्हा निवडणूक येईल तेव्हा त्यावर बोलेल,” असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्या उत्तराने भाजप आणि मनसेच्या युतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

आशिष राज भेट

आज सकाळी आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे. राज ठाकरे यांच्या बंगल्यावर जात आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून एक तास त्या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. सध्या अजित पवार हे भाजपमध्ये असले तरीही फारसा भाजपला फायदा नसल्याचं बोललं जात आहे. म्हणून राज ठाकरे यांना सोबत घेण्याबाबत चर्चा आहेत. मात्र राज ठाकरे यांनी यावर कोणतंही वक्तव्य केलं नाही.

राज ठाकरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोगाने मुंबई पालिकेच्या निवडणुकीवेळेस मुंबई शिक्षकांनी वेळेत येण्याबाबत आदेश दिले आहेत. वेळेत न आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आहेत.

निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतप्त

निवडणूक आयोगाने मुंबई पालिकेच्या निवडणुकीवेळेस शिक्षिकांनी वेळेवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत नाहीतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले. याप्रकरणावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे. “निवडणुका दर पाच वर्षांनी येतात तर निवडणुकांची तयारी का करत नाहीत? पाच वर्षे आयोग काय झोपा काढतो का? खरं तर निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

News Title – Raj Thackeray Ashish Shelar news

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव उतरले?, जाणून घ्या आजचे दर

बाजारात नव्या बाईकची एंट्री; Kawasaki ची जबरदस्त बाईक लाँच, जाणून घ्या किंमत

शरद पवारांना बसणार आणखी एक मोठा धक्का!

आयेशा टाकियाने सोडलं मौन, ट्रॉलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली…

अमिताभ बच्चन यांचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाले, “15 तास स्वतःला खोलीमध्ये..”