शरद पवार गटाला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

Sharad Pawar

Jayant Patil | गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये धक्कादायक ट्वीस्ट घडताना दिसत आहेत. भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना गळाला लावत आहे. काही दिवसांआधी काँग्रेस पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

जयंत पाटील भाजपच्या वाटेवर?

आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे गटात आणि शरद पवार गटात मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही गटाला पक्ष बांधणीसाठी मेहनत करावी लागणार आहे. कारण निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं असल्याचा निर्णय दिला आहे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या वाटेवर जात असल्याच्या चर्चा आहेत.

जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये गेल्या काही वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्राची धुरा संभाळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी तपासणी सुरू होती तेव्हा ते रोहित पवार यांच्यापासून लांब लांब जात होते. यावरून अनेकांनी जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता जयंत पाटील यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

“मी भाजपमध्ये जाणार नाही, मला भाजपकडून कोणतीही ऑफर आलेली नाही. भाजप नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही. अलिकडच्या काळातमध्ये दिल्लीला जाता आलं नाही. आमची सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे, तेव्हा गेलो होतो. त्यावेळी अशी कोणतीही बैठक झाली नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

राजू शेट्टींबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, “राजू शेट्टींसोबत आमची चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेली आठ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली. तिन्ही पक्षांसोबत समन्वय झाला आहे. येत्या सात ते आठ दिवसांमध्ये निष्कर्ष येईल”, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा होत्या. त्यावर ते म्हणाले कोण उलट चर्चा घेतंय कारण आमची प्रसिद्धी होत आहे. रावेल येथे एकनाथ खडसे लढणार होते पण त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्याजागी दुसरा पर्याय शोधत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

News Title – Jayant Patil News Update

महत्त्वाच्या बातम्या

रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!

शिवजयंतीदिवशी अभिनेता रितेश देशमुखची सर्वांत मोठी घोषणा!

“संघींवर आता सिंहांच्या लव्ह जिहादचा धोका”, स्वरा भास्करची पोस्ट चर्चेत

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .