Gold-Silver Rate Today | सोने-चांदीच्या भावात या आठवड्यात उसळी दिसून येत आहे. सोने-चांदीच्या किमती कमी-जास्त होतानाचा ट्रेंड या दोन महिन्यात दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीला (Gold-Silver Rate Today ) आणि शेवटी सोन्याच्या किमती वधारताना दिसल्या.
आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले आहेत. तर, चांदीने काही अंशी दिलासा दिला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. गेल्या आठवड्यात सोन्यात 900 रुपयांची घसरण दिसून आली तर चांदी 1500 रुपयांनी महागली होती. आज (20 जानेवारी) सोने वधारले तर चांदीत घसरण दिसून आली.
आजचे सोने-चांदीचे दर-
आठवड्याच्या शेवटी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावात 200 तर 17 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी महागले. तर काल 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Rate Today ) सोने-चांदीच्या कॅरेटनुसार किंमती ठरवल्या आहेत. त्यानुसार आता 22 कॅरेट सोने 57,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,820 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
चांदीचा ग्राहकांना दिलासा
या आठवड्यात चांदीने ग्राहकांना काही अंशी दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. चांदीच्या किमती 16 फेब्रुवारी रोजी 1100 रुपयांनी वधारल्या. 17 फेब्रुवारी रोजी 900 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर आज 20 फेब्रुवारी (Gold-Silver Rate Today ) रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 76,000 रुपये झाला आहे.
आज सोने-चांदीच्या किमती पुन्हा वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लागू केला जात नाही, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत होत असते.
News Title : Gold-Silver Rate today 20 feb
महत्त्वाच्या बातम्या –
एकटे टाटा सगळ्या पाकिस्तानवर ‘भारी’, शेजाऱ्यांच्या GDP ला टाकलं मागं
बाप तसा बेटा! ‘गड आला, पण सिंह गेला’, अर्जुन तेंडुलकरची ‘सर्वोत्तम’ कामगिरी!
परीक्षेत चक्क सनी लिओनीचं ॲडमिट कार्ड; तपासात झाला धक्कादायक खुलासा
शेतकरी आंदोलन! सात जिल्ह्यांमध्ये ‘या’ गोष्टीवर बंदी; सरकारचा मोठा निर्णय
“अजित पवारांच्या राजकारणाची तुलना न्यायाधीशांनी पाकिस्तानातील राजकारणाशी केली, याची लाज वाटली”