बाप तसा बेटा! ‘गड आला, पण सिंह गेला’, अर्जुन तेंडुलकरची ‘सर्वोत्तम’ कामगिरी!

Arjun Tendulkar | क्रिकेटच्या इतिहासात शतकांचे शतक झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा रणजी ट्रॉफीमध्ये घाम गाळत आहे. मुंबईच्या संघातून संधी न मिळाल्याने अर्जुन तेंडुलकर गोव्याच्या संघातून रणजी ट्रॉफी खेळत आहे. सध्या अर्जुन चांगल्या लयनुसार खेळी करत असून त्याने अष्टपैलू कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. अर्जुनने रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत मोठी कामगिरी केली आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या रणजी कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल टाकला.

अर्जुनने या सामन्यात 4 बळी घेतले, ही त्याची रणजी ट्रॉफीमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मात्र, असे असतानाही या सामन्यात त्याचा संघ गोव्याला पराभवाचा सामना करावा लागला. अर्जुन देशांर्गत क्रिकेटमध्ये गोव्याच्या संघाचा भाग आहे. नुकताच गुजरात आणि गोवा यांच्यात सामना खेळवला गेला, ज्यात अर्जुन गोव्याचे प्रतिनिधित्व करत होता.

गोवा संघाचा पराभव

गोव्याने पहिल्या डावात 317 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गुजरातने 79 षटकांत 5 गडी गमावून 281 धावा केल्या होत्या. गुजरातचा संघ मोठी आघाडी घेईल असे अपेक्षितच होते, कारण त्यांचे पाच गडी शिल्लक होते आणि एक सेट फलंदाजही खेळपट्टीवर टिकून होता. गुजरातच्या संघाने सर्वबाद 346 धावा केल्या. दुसऱ्या डावात गोवा संघ अवघ्या 143 धावांत तंबूत परतला. मग 115 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करून गुजरातने विजय मिळवला.

पहिल्या डावात गुजरातने 346 धावांचा डोंगर उभारला. पण, अर्जुन तेंडुलकरने 21 षटकांत 49 धावा देत 4 बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाला 400 च्या आत रोखले. गुजरातकडून सर्वाधिक 171 धावांची खेळी करणाऱ्या प्रियांक पांचालला अर्जुनने बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय रवी बिश्नोई, चिंतन गजा आणि सिद्धार्थ देसाई यांना देखील त्याने बाद केले.

Arjun Tendulkar ची सर्वोत्तम कामगिरी

पहिल्या डावात अर्जुनने एकूण 4 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात त्याला 1 बळी घेता आला. अर्जुनच्या अप्रतिम स्पेलमुळे गुजरात संघाला मोठी आघाडी मिळवता आली नाही. अर्जुन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. अर्जुनने त्याचे काम चोखपणे पार पाडले मात्र गोव्याच्या फलंदाजांचा फ्लॉप शो संघाला पराभव देऊन गेला.

अर्जुनची आतापर्यंतची कामगिरी गोव्यासाठी चांगली आहे. त्याने 6 सामन्यात 258 धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 70 आहे. तसेच गुजरातविरूद्धच्या सामन्यात त्याला एकूण 5 बळी घेण्यात यश आले. याच सामन्यात अर्जुनने पहिल्या डावात 45 आणि दुसऱ्या डावात 14 धावा केल्या.

News Title- Arjun Tendulkar was an all-rounder with 4 wickets against Gujarat while playing for Goa in the Ranji Trophy

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटपटू Ravichandran Ashwin च्या पत्नीचा मोठा खुलासा! म्हणाली..

रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!

शिवजयंतीदिवशी अभिनेता रितेश देशमुखची सर्वांत मोठी घोषणा!