एकटे टाटा सगळ्या पाकिस्तानवर ‘भारी’, शेजाऱ्यांच्या GDP ला टाकलं मागं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ratan Tata | शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी मागील वर्षभरात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. त्यामुळे टाटा समूहाच्या मार्केट कॅपमध्ये लक्षणीय वाढ झाली. विशेष बाब म्हणजे टाटा समूहाचे मार्केट कॅप पाकिस्तानच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त झाले आहे. माहितीनुसार, टाटा समूहाचे एकूण मार्केट कॅप 365 अब्ज डॉलर्स म्हणजेच 30.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा एकूण जीडीपी 341 अब्ज डॉलर्स एवढा आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष म्हणजेच आयएमएफने दिली.

टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या TCS बद्दल भाष्य करायचे झाले तर, तर तिचे मूल्यांकन (Valuation) 170 अब्ज डॉलर्स म्हणजेच 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. टाटा समूहाच्या मार्केट कॅपमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षभरात त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली प्रचंड वाढ.

टाटा पाकिस्तानवर ‘भारी’

टाटा मोटर्स आणि ट्रेंटमधील मल्टीबॅगर रिटर्न्स शिवाय मागील एक वर्षभराच्या कालखंडात टायटन, टीसीएस आणि टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेअर बाजारात नुकत्याच सूचीबद्ध झालेल्या टाटा टेक्नॉलॉजीसह किमान 8 टाटा कंपन्यांचे व्हॅल्युएशन गेल्या एका वर्षात दुप्पट झाले आहे. ज्यामध्ये TRF, ट्रेंट, बनारस हॉटेल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि आर्टसन इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे.

Ratan Tata यांचा बोलबाला

दिवसेंदिवस शेअर बाजाराकडे गुंतवणुकदारांचा कल वाढत चालला आहे. टाटा समूहाच्या एकूण 25 कंपन्या बाजारात सूचिबद्ध आहेत. किमान 25 टाटा कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध असून त्यापैकी टाटा केमिकल्स हीच कंपनी मूल्यांकनाच्या बाबतीत 5 टक्क्यांनी तोट्यात आहे. टाटा सन्स, टाटा कॅपिटल, टाटा प्ले, टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि एअरलाइन्स बिझनेस यांसारख्या सूचीबद्ध नसलेल्या टाटांच्या कंपन्यांचे अंदाजे मार्केट कॅप विचारात घेतल्यास एकूण मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट

भारताच्या जीडीपीचा सध्याचा आकार सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलर आहे. जर आपण आकडेवारी पाहिली तर भारताचा जीडीपी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा 11 पट मोठा आहे. आर्थिक वर्ष 2028 पर्यंत जपान आणि जर्मनी या दोन्ही देशांना मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. सध्या भारत ही जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी 6.1 टक्के होता. तर एक वर्षापूर्वी हा आकडा 5.8 टक्के होता. आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात झालेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अन् त्यामुळे 2023 या आर्थिक वर्षात पाकिस्तानचा विकास दर घसरण्याची शक्यता आहे.

News Title- market cap of industrialist Ratan Tata’s Tata group of companies is greater than Pakistan’s GDP
महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटपटू Ravichandran Ashwin च्या पत्नीचा मोठा खुलासा! म्हणाली..

रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!

शिवजयंतीदिवशी अभिनेता रितेश देशमुखची सर्वांत मोठी घोषणा!