परीक्षेत चक्क सनी लिओनीचं ॲडमिट कार्ड; तपासात झाला धक्कादायक खुलासा

Sunny Leone

Sunny Leone | उत्तर प्रदेशातील पोलीस भरती परीक्षा एका भन्नाट कारणामुळे चर्चेत आहे. 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या पोलीस परीक्षेत सनी लिओनीच्या नावाने प्रवेशपत्र जारी केल्याची बाब समोर आली होती. हे प्रकरण उघडकीस येताच सनी लिओनीच्या नावाचे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पोलिसांनी तपास केला असता सत्य समोर आले आहे. या संदर्भात भरती मंडळानेही निवेदन जारी केले आहे. मात्र, स्थानिक प्रशासन भोंगळ कारभारामुळे टीकारांच्या निशाण्यावर आले आहे.

17 आणि 18 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळातर्फे पोलीस भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा राज्यभरातील 2300 हून अधिक केंद्रांवर दोन दिवस चालली आणि सुमारे 48 लाख उमेदवार भरती परीक्षेला बसले होते.

तपासात धक्कादायक खुलासा

पण, एका उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर चक्क सनी लिओनीचे नाव आणि फोटो आढळला, जे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता सत्य बाहेर आले. याप्रकरणी आता भरती मंडळाने एक निवेदन जारी केले असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरं तर ज्या उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर सनीचा फोटो छापून आला त्याला परीक्षा देखील देता आली नाही.

दरम्यान, ज्या उमेदवाराच्या ॲडमिट कार्डवर सनी लिओनीचे नाव आणि फोटो होता. तो उमेदवार महोबा जिल्ह्यातील येथील रहिवासी आहे. मागील दोन वर्षांपासून तो परीक्षेची तयारी करत होता. त्याचे नाव धर्मेंद्र कुमार असून त्याने पोलिसांसमोर आपली व्यथा मांडली. खासगी कॅफेतून अर्ज केला मात्र अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरल्याचा दावा त्याने केला. याशिवाय सनी लिओनीचे नाव आणि फोटो कसा आला हे माहित नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Sunny Leone चे प्रवेशपत्र अन् खळबळ

या संदर्भात उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळाने (UPPRPB) सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 17 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान करेक्शन विंडो खुली करण्यात आली होती. अशा परिस्थितीत ज्याच्याकडे त्या उमेदवाराचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड होता. त्याने अर्जदाराचे नाव, वैयक्तिक तपशील आणि फोटोशी छेडछाड केली आणि त्याऐवजी अभिनेत्रीचे नाव आणि फोटो टाकला.

पदोन्नती मंडळाने उमेदवारांना इशारा दिला आहे. भर्ती बोर्डाने म्हटले आहे की, उमेदवारांनी त्यांच्या अर्ज फॉर्मशी संबंधित कोणतीही माहिती जसे की वैयक्तिक तपशील, लॉगिन आयडी आणि पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, आयपी ॲड्रेस ट्रेस केल्यानंतर महोबा पोलीस अधीक्षकांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

News Title- UPPRPB has issued a warning regarding the discovery of actress Sunny Leone’s admit card in Uttar Pradesh police recruitment exam
महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटपटू Ravichandran Ashwin च्या पत्नीचा मोठा खुलासा! म्हणाली..

रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!

शिवजयंतीदिवशी अभिनेता रितेश देशमुखची सर्वांत मोठी घोषणा!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .