शेतकरी आंदोलन! सात जिल्ह्यांमध्ये ‘या’ गोष्टीवर बंदी; सरकारचा मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Farmers Protest | पुन्हा एकदा शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे कूच केल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी बाळगली जात आहे. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) कायदेशीर हमी आणि कर्जमाफी तसेच इतर मागण्यांसह शेतकऱ्यांनी दिल्लीतील केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा ‘दिल्ली चलो’ या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत.

शेतकरी आंदोलनामुळे परिस्थिती बिघडू नये यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हरयाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवरील बंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल इंटरनेटवरील बंदी 20 फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, सिरसा, फतेहाबाद आणि हिसार यांचा समावेश आहे.

हरयाणा सरकारचा मोठा निर्णय

शेतकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा पाहता सरकारने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. यापूर्वी 13, 15 आणि 17 फेब्रुवारी अशी मोबाईल इंटरनेट सेवा निलंबनाची मुदत वाढवली होती. प्रामुख्याने हरयाणा आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आगामी काळात लोकसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे हे आंदोलन मोठा फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे.

हरयाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव टीव्ही एस एन प्रसाद यांनी आदेशात म्हटले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर असे आढळून आले की अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जींद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यातील परिस्थिती अजूनही तशीच आहे. येथील वातावरण गंभीर आणि तणावपूर्ण आहे. इंटरनेट सेवेचा गैरवापर करून प्रक्षोभक गोष्टी आणि अफवा पसरवल्या जाऊ शकतात. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Farmer Protest । दिल्ली चलो आंदोलन

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, पटियाला, संगरूर आणि फतेहगढ साहिबसह पंजाबमधील काही जिल्ह्यांतील काही निवडक भागात इंटरनेट सेवांवरील बंदी 24 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील या जिल्ह्यांमध्ये 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने 16 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, पटियालाच्या शंभू, जुल्कान, पासियान, पाटरण, शतरणा, सामना, घनौर, देवीगड आणि बलभेरा या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. याशिवाय मोहालीतील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

News Title- Farmer Protest Haryana government has stopped mobile internet service in seven districts till February 20
महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटपटू Ravichandran Ashwin च्या पत्नीचा मोठा खुलासा! म्हणाली..

रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!

शिवजयंतीदिवशी अभिनेता रितेश देशमुखची सर्वांत मोठी घोषणा!