“अजित पवारांच्या राजकारणाची तुलना न्यायाधीशांनी पाकिस्तानातील राजकारणाशी केली, याची लाज वाटली”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad | राज्याचे राजकारण एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्हीही पक्षातील गटांमध्ये पक्ष आणि चिन्ह यावरून वाद सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत. अशातच सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाकडून न्यायायात पक्षाचे नाव अन् चिन्हाच्या मुद्द्यावरून याचिका करण्यात आली होती.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी दोन्ही पक्षातील दोन्ही गटांमध्ये मागील काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे. अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निर्णय दिला. चिन्ह आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला गेल्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

राष्ट्रवादीतील ‘सर्वोच्च’ वाद!

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाच्या याचिकेवरील सुनावणीवर शिक्कामोर्तब करत पुढील आदेश येईपर्यंत शरद पवार गटाला दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेवण्याचे आदेश दिले. तसेच शरद पवार गटाने चिन्ह मागितल्यानंतर त्यांना एक आठवड्यात चिन्हे दिले जावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या निर्णयाचे शरद पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वागत केले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अजित पवारांवर बोचरी टीका करत त्यांना लक्ष्य केले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर दिल्लीतून विमान पकडून आताच मुंबईत आलो. प्रवासातील दोन तासात डोकं चक्रावून गेलं होतं. आज जे काही सर्वोच्च न्यायालयात घडलं, अन् सुनावणी दरम्यान जे काही दोन न्यायाधीशांच्या तोंडून ऐकलं. ते यातना देणारं होतं. महाराष्ट्रात अजित पवार यांनी केलेल्या राजकारणाची तुलना न्यायाधीशांनी थेट पाकिस्तानातील राजकारणाशी केली, याची लाज वाटली.”

 

Jitendra Awhad यांची बोचरी टीका

“एखाद्याला जर जनाची नव्हे तर मनाची लाज असेल तर आपण केलेले कृत्य हे सर्वोच्च न्यायालयाने मारलेली थापड आहे, हे ओळखून राजीनामा देईल. पण, शरद पवार यांना संपवण्यासाठी ज्या पातळीवर हे लोक घसरले आहेत. त्यांच्याकडून अशी अपेक्षाच ठेवणे चुकीचे आहे. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाचे स्वरूप पाकिस्तानातील राजकारणाशी समरूप साधतंय, हे दोन न्यायाधीशांच्या तोंडून ऐकलं, हे मराठी माणूस म्हणून मला खूपच खेदजनक वाटतंय”, असेही आव्हाड यांनी नमूद केले.

दरम्यान, शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने अजित पवार गटावर बोचरी टीका करत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर आव्हाडांनी शरद पवारांसाठी किल्ला लढवला. बड्या नेत्यांनी पवारांची साथ सोडल्यापासून त्यांनी सतत आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांशी दोन हात केले.

News Title- MLA Jitendra Awhad has criticized Ajit Pawar after the Supreme Court verdict
महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटपटू Ravichandran Ashwin च्या पत्नीचा मोठा खुलासा! म्हणाली..

रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!

शिवजयंतीदिवशी अभिनेता रितेश देशमुखची सर्वांत मोठी घोषणा!