“जॅकी बाळा…”, सुकेशचे जॅकलिनला आणखी एक पत्र; ‘व्हॅलेंटाईन’ अन् मोठा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sukesh Chandrashekhar | बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर नेहमी चर्चेत असतात. सुकेश 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहे आणि नेहमी तो जॅकलिनला पत्र लिहित असतो. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सुकेशने पुन्हा एक लांबलचक पत्र लिहून जॅकलिनवरचे प्रेम व्यक्त केले आहे. मात्र, अभिनेत्रीने त्याच्या एकाही पत्राला कधीच प्रतिसाद दिला नाही. आता सुकेशचे नवीन पत्र समोर आले आहे.

सध्या तुरूंगात असलेल्या सुकेशने 4 पानांच्या पत्रात लिहिले की, जॅकी मी तुझ्यावर प्रेम करतो… बाळा तू माझ्या हृदयाच्या ठोक्याचे कारण आहेस. बाळा, मला तुझी खूप आठवण येते, व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक क्षणी फक्त तुझ्याबद्दलच विचार केला. एकमेकांशिवाय आपला हा दुसरा व्हॅलेंटाइन आहे, परंतु भविष्यात असे होणार नाही. सर्वकाही ठीक होईल.

सुकेश अद्याप तुरूंगात

सुकेशच्या सततच्या पत्रांमुळे जॅकलिन दुखावती होती आणि तिने सुरक्षेची मागणी केली होती. अभिनेत्रीने सांगितले की, सुकेश तिला धमकी देतो. याचा दाखला सुकेशने नवीन पत्रात दिला आहे. खरं तर जॅकलीनने जेव्हा सुकेशवर आरोप केले तेव्हा त्याने देखील अभिनेत्रीचे गुपित उघड करण्याची धमकी दिली होती. आता सुकेशने याबद्दल माफी मागितली आणि आजूबाजूच्या लोकांनी असे पत्र लिहिण्यास प्रवृत्त केल्याचे सांगितले.

सुकेशने पत्रात आणखी म्हटले की, प्रत्येकजण व्यक्त होत असतो आणि गोंधळून गेल्यानंतर काहीही करतो जे कदाचित करायला नको हवे असे नंतर कळते. जॅकी, मी पण तुझ्या विरोधात गेलो, पण मी थांबलो कारण माझ्या हृदयाने मला सांगितले की, मी तुला कसे काय दुखवू शकतो. मी माझ्या प्रिय व्यक्तीला दुखवू शकत नाही म्हणून मी मागे हटलो आणि स्वतःवर रागावलो.

 

Sukesh Chandrasekhar चे आणखी एक पत्र

सुकेशने गोल्ड डिगरच्या नावाचा देखील पत्रात उल्लेख केला, ज्यावरून नोरा फतेही टार्गेट असल्याचे मानले जात आहे. सुकेशचे म्हणणे आहे की, गोल्ड डिगरने त्याला जॅकलिनच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. “गोल्ड डिगर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याआधीही माझ्या आणि जॅकीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. आता या वाईट काळात पुन्हा प्रयत्न केला जात आहे. एक गोष्ट समजून घ्या, जॅकी माझी आहे आणि मी नेहमीच तिचा राहीन”, असेही सुकेशने सांगितले.

दरम्यान, सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडिस 2021 पासून एकमेकांना ओळखतात. सुकेश तिहार जेलमधून जॅकलिनशी बोलायचा आणि तिला अनेक महागड्या भेटवस्तू देत असे. मात्र, अभिनेत्रीने आपले त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. पण, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिची अनेकदा चौकशी केली आहे.

News Title- Detained Sukesh Chandrasekhar Writes Valentine’s Day Letter To Bollywood Actress Jacqueline Fernandez
महत्त्वाच्या बातम्या –

धक्कादायक! शेकडो गायींचे जंगलात आढळले मृतदेह; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

क्रिकेटपटू Ravichandran Ashwin च्या पत्नीचा मोठा खुलासा! म्हणाली..

रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!