Horoscope Today | आज 20 फेब्रुवारी रोजी एकादशी असल्याने काही राशींवर गणपतीची कृपा असणार आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी शुभ ठरणार आहे. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी (Horoscope Today) असते. ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे वर्णन केलेले असते.
या 12 राशीपैकी काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. तर, आज कुणाचा विनाकारण खर्च वाढू शकतो. आज कुणाच्या राशी भविष्यात काय आहे, याची माहिती खाली दिली आहे.
आजचे राशी भविष्य
वृषभ: या राशीच्या लोकांचे वैवाहिक आयुष्य आज आंनदीत जाईल. मात्र, किरकोळ मतभेद होऊ शकतात. या लोकांनी आज अति विचार करू नये. मनात पूर्वग्रह बाळगू नयेत.
मिथुन: या राशीच्या लोकांनी आपल्या वैवाहिक आयुष्यकडे लक्ष द्यावे. मनातील गैरसमज दुर करावे. आज यांच्या व्यवसायात भरभराटी येईल.
कर्क: घाईमध्ये कोणतंही काम करू नका. आज तुम्ही खेळात यश मिळवाल. मात्र मुलांकडे अहहिक लक्ष देणे आवश्यक आहे.
सिंह: या राशीच्या लोकांनी आज कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. जमिनीची कामे तूर्तास करू नयेत. तब्येतीत काहीसा फरक पडेल.
कन्या: या राशीच्या लोकांचा आज (Horoscope Today) प्रवास योग आहे. त्यांनी आज प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत विरोधी वाटू शकते. यांना आज अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
वृश्चिक: आज या राशीच्या व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवेल. तुमच्या धाडसात वाढ होईल.
धनू: यांनी आज सामाजिक वादात अडकू नये. आज आर्थिक फायदा होऊ शकतो. आपल कला जोपासण्यासाठी वेळ काढावा. कलेला प्रोत्साहन द्यावे.
तूळ: आज या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. तुम्ही आज नातेवाईकांचे प्रश्न सोडवाल. हातातील कामावर अधिक लक्ष द्यावे.
मकर: या व्यक्तींनी आज (Horoscope Today) खर्च करताना विचार करून खर्च करावा. बोलण्यात लाघवीपणा ठेवाल. काम करण्यात आळस करू नका. वेळेवर आपली कामे पूर्ण करा.
कुंभ: आज तुमचा दिवस आनंदात जाईल. मात्र प्रवास करताना काळजी घ्या.
मीन: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी लाभ होईल. मात्र सत्यपणा बाळगा. आपली सत्यता आपल्याला यश मिळवून देईल.
मेष : आज तुम्ही कामे नियमित पर पडतील. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. जोडीदाराची साथ मिळेल.
News title – Horoscope Today 20 feb
महत्वाच्या बातम्या-
आज ‘या’ राशींवर राहील गणेश कृपा; पाहा आजचं राशीभविष्य
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
ग्राहकांना मोठा धक्का! सोनं महागलं, जाणून घ्या दर
मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
केकेआरमध्ये नव्या खेळाडूची एंट्री; ‘या’ वेगवान गोलंदाजाला दिली संधी