कल्याणमध्ये पुन्हा राडा; गणपत गायकवाड प्रकरणात मोठा ट्विस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikwad | गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीला प्रोत्सहान मिळत असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिजीत घोसाळकर यांची गोळ्या घालत हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा गणपत गायकवाड प्रकरणामध्ये ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड यांच्या कल्याण पूर्व भागातील कार्यालय फोडण्यात आलं आहे. यामुळे आता कल्याणमध्ये गणपत गायकवाड प्रकरणानंतर पुन्हा एकदा थरार पाहायला मिळाला आहे. अभिमन्यू हे माजी नगरसेवक होते. त्यांचे कार्यालय हे कल्याणमधील तिसाई चौक परिसरामध्ये आहे. चार ते पाच जणांनी त्यांचं कार्यालय फोडलं आहे.

वादाचं कारण आलं समोर

कल्याणमधील तिसाई चौकामध्ये अभिमन्यू यांचं जीरीमरी व्हीजन नावाचं कार्यालय आहे. याठिकाणी या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड केली आहे. पार्किंगच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. टोळक्यांनी कल्याणमध्ये शिरून हे काम केलं आहे. या प्रकरणामध्ये कल्याण कोळसेवाडीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Ganpat Gaikwad)

कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

कल्याणमधील तिसगाव परिसरामध्ये ही घटना घडली. पार्किंगवरुन वाद झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशातच आता कार्यालयाच्या तोडफोडीसोबतच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान हे प्रकरण राजकीय वादातून झालं असल्याची चर्चा आहे, मात्र पोलिसांनी अंतिम सत्य हे तपासातच कळेल अशी माहिती दिली आहे.

कल्याणमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक वाद होताना दिसत आहेत. अनेक गोळीबार होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनेक गुन्हेगारांसोबतचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. तसेच गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमध्ये हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. त्यानंतर आता गणपत गायकवाड यांच्या भावाचे कार्यालय फोडले आहे.

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांना ठाण्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांआधी त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला. त्यावेळी त्यांच्या नावाची बॅनरबाजी करत कल्याणकरांनी त्यांचे जंगी स्वागत केलं.

News Title – Ganpat Gaikwad News Update 

महत्त्वाच्या बातम्या

विशेष अधिवेशनापुर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा!

एकटे टाटा सगळ्या पाकिस्तानवर ‘भारी’, शेजाऱ्यांच्या GDP ला टाकलं मागं

बाप तसा बेटा! ‘गड आला, पण सिंह गेला’, अर्जुन तेंडुलकरची ‘सर्वोत्तम’ कामगिरी!

परीक्षेत चक्क सनी लिओनीचं ॲडमिट कार्ड; तपासात झाला धक्कादायक खुलासा

शेतकरी आंदोलन! सात जिल्ह्यांमध्ये ‘या’ गोष्टीवर बंदी; सरकारचा मोठा निर्णय