राज्यातील निवासी डॉक्टरांचा मोठा निर्णय, सरकारला दिला शेवटचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Doctor Strike | राज्यातील निवासी डॉक्टरांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. राज्य सरकारशी वाटाघाटी फिसकटल्यातर, पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा डॉक्टरांनी (Doctor Strike) दिला आहे. त्यामुळे शासनाची चांगलीच डोकेदुखी वाढू शकते.

या संदर्भात सरकारने मार्डसोबत एक 7 फेब्रुवारी रोजी एक बैठक घेतली होती. मात्र सरकारने यावर काहीच यशस्वी तोडगा काढला नसल्याने डॉक्टरांनी नाराजी जाहीर केली आहे. तसेच पुन्हा एकदा संपची हाक दिली आहे.

निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर

7 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत मार्डची चर्चा झाली. या चर्चेनंतर डॉक्टरांनी त्याच दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली होती. आता मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणीच केली नसल्याचा आरोप करत निवासी डॉक्टर (Doctor Strike ) गुरुवारपासून संपावर जाणार आहेत.

राज्यातील निवासी डॉक्टर संघटनाने (मार्ड) गुरुवारी संध्याकाळपासून संपावर जाणार असल्याचे परिपत्रक काढून जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्याबरोबरच दर महिन्याच्या ठरावीक तारखेला नियमितपणे वेतन देण्याची ग्वाही देण्यात आली होती.

यासोबतच वसतिगृह तातडीने दुरुस्त करणार असल्याचे डॉक्टरांना यावेळी सांगितले होते. हे सर्व आश्वासन दिले खरे मात्र, त्याची अंमलबजावणीच केली नसल्याने मार्डने नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या 25 वैद्यकीय महाविद्यालये असून या संपाच्या काळात तत्काळ विभागातील सर्व सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आश्वासनाची अंमलबजावणी झालीच नाही

मागच्या वर्षीही मार्डने (Doctor Strike ) या मागण्यांसाठी पुढाकार घेतला होता. तेव्हा काही आश्वासने देण्यात आली होती. त्याच आश्वासनावर विश्वास ठेवत डॉक्टरांनी 3 जानेवारीला संप मागे घेतला होता. आश्वासन देऊन आता वर्ष लोटली. पण, यावर पुढची काहीच भूमिका न घेतल्याने पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. तत्पूर्वी 7 फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीनंतरही आश्वासन देऊन तोंडाला पानं पुसली गेल्याने संपाचा इशारा देण्यात आला आहे.

News Title- Mard Doctor Strike on 22 feb

महत्त्वाच्या बातम्या –

एकटे टाटा सगळ्या पाकिस्तानवर ‘भारी’, शेजाऱ्यांच्या GDP ला टाकलं मागं

बाप तसा बेटा! ‘गड आला, पण सिंह गेला’, अर्जुन तेंडुलकरची ‘सर्वोत्तम’ कामगिरी!

परीक्षेत चक्क सनी लिओनीचं ॲडमिट कार्ड; तपासात झाला धक्कादायक खुलासा

शेतकरी आंदोलन! सात जिल्ह्यांमध्ये ‘या’ गोष्टीवर बंदी; सरकारचा मोठा निर्णय

“अजित पवारांच्या राजकारणाची तुलना न्यायाधीशांनी पाकिस्तानातील राजकारणाशी केली, याची लाज वाटली”